एक्सरसाइज केल्यावर कुठे जाते पोटाची चरबी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 11:58 AM2018-09-26T11:58:46+5:302018-09-26T11:58:59+5:30
खूप जास्त पोट बाहेर आल्याने फिट राहण्यासाठी जिम जॉईन केलं आणि काही महिन्यात तुम्हाला फरकही दिसून आला. तुमचं बाहेर आलेलं पोटही आत गेलं असेल.
खूप जास्त पोट बाहेर आल्याने फिट राहण्यासाठी जिम जॉईन केलं आणि काही महिन्यात तुम्हाला फरकही दिसून आला. तुमचं बाहेर आलेलं पोटही आत गेलं असेल. पण काय कधी तुम्हा विचार केलाय का की, वजन कमी झाल्यावर पोटावरील चरबी जाते कुठे? काही लोकांचं म्हणनं आहे की, जी चरबी आपण घटवतो ती ऊर्जेमध्ये बदलते. पण असे होत नाही.
ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या यूनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्सचे प्रोफेसर अॅंड्रयू जे ब्राऊन आणि अभ्यासक रुबेन मीरमान यांच्यानुसार, चरबी ऊर्जेमध्ये बदलणे शक्य नाहीये. कारण असे झाल्यास पदार्थाच्या संरक्षणाच्या नियमाचं उल्लंघन होतं.
प्रोफेसर ब्राऊन आणि मीरमान यांच्यानुसार, चरबी कार्बन डायऑक्साइड आणि पाण्यात रुपांतरित होते. कार्बन डायऑक्साइड श्वास सोडल्यानंतर आपल्या शरीरातून बाहेर निघतो. राहिला प्रश्न पाण्याचा तर ते वेगवेगळ्या शारीरिक प्रक्रियांमधून लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतं. या दोन्ही तज्ज्ञांचा हे उत्तर ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.
या दोघांचंही म्हणनं आहे की, आपण जे काही खातो ते कार्बन डायऑक्साइडच्या रुपाने आपल्या शरीरातून बाहेर फेकलं जातं. आपण जेही कार्बोहायड्रेट घेतो ते कार्बन डायऑक्साइड आणि पाण्यात एकरुप होतं.
हीच प्रक्रिया प्रोटीनसोबतही होते. पण काही गोष्टी यूरिया आणि दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये वाटल्या जातात. आणि नंतर बाकी गोष्टी शौच, घाम आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतात. केवळ फायबर्सच असतात जे आपल्या पोटापर्यंत पोहोचतात आणि पचनक्रियेनंतर शिल्लक राहिलेल्या गोष्टी शौचावाचे बाहेर पडतात.
या तथ्यावर जर विश्वास ठेवला तर हे ध्यानात येतं की, चरबीचा एक भाग फुफ्फुसाच्या माध्यामातून कार्बन डायऑक्साइडच्या रुपात बाहेर पडतो. तज्ज्ञांचं म्हणनं आहे की, याचा अर्थ हा होत नाही की, घाईघाईने आणि वेगाने श्वास घेतल्यास वजन कमी केलं जाऊ शकतं. प्रोफेसर ब्राऊन आणि अभ्यासक मीरमान सांगतात की, असे केल्याने चक्कर येऊ शकते आणि असेही होऊ शकते की व्यक्ती बेशुद्ध पडेल.