कसं ओळखाल आता टूथब्रश बदलण्याची आली आहे वेळ? योग्य टूथब्रश कसा निवडाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 03:49 PM2024-06-01T15:49:12+5:302024-06-01T15:50:03+5:30

When to change your toothbrush : टूथब्रश बदलण्याची वेळ आली आहे हे कसं ओळखाल? किंवा टूथब्रश किती दिवसांनी बदलावा हे अनेकांना माहीत नसतं. आज आपण हेच जाणून घेणार आहोत.

When you should change your toothbrush? | कसं ओळखाल आता टूथब्रश बदलण्याची आली आहे वेळ? योग्य टूथब्रश कसा निवडाल?

कसं ओळखाल आता टूथब्रश बदलण्याची आली आहे वेळ? योग्य टूथब्रश कसा निवडाल?

When to change your toothbrush : दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर दात स्वच्छ करणं किती गरजेचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. दातांचं, तोडांचं आणि एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ब्रश करणं फार गरजेचं आहे. असं केलं नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. बरेच लोक एक मोठी चूक करतात. ते एकच टूथब्रश अनेक महिने वापरतात. पण टूथब्रश बदलण्याची वेळ आली आहे हे कसं ओळखाल? किंवा टूथब्रश किती दिवसांनी बदलावा हे अनेकांना माहीत नसतं. आज आपण हेच जाणून घेणार आहोत.

किती दिवसांनी बदलावा ब्रश?

द सेंटर्स फॉर डिजीज प्रिवेंशन अॅन्ड कंट्रोलनुसार, सामान्यपणे ३ ते ४ महिन्यांनंतर आपला टूथब्रश बदलणं गरजेचं आहे. याचा अर्थ असाही नाही की, ब्रश  आधीच खराब झाला असेल तरी तुम्ही चार महिन्यांपर्यंत तो बदलण्याची वाट बघावी. जर तुमच्या ब्रशचे ब्रिशल म्हणजे दाते खराब झाले असतील, तुटत असतील किंवा पूर्णपणे वाकले असतील तर तुम्ही वेळीच ब्रश बदलण्याची गरज आहे. 

कसं कळेल ब्रश बदलण्याची वेळ झाली?

ब्रशचे दाते पाहून तुम्हाला हे समजू शकतं की, ब्रश बदलण्याची वेळ झाली आहे. जसे की, ब्रशचे ब्रिशल तुटत असतील तर तो वेळीच बदलावा. अनेक लोकांचं मत आहे की, ब्रिशलच्या खालच्या भागात पांढरा थर जमा झाला असेल तर वेळीच ब्रश बदलावा. जास्त काळ एकाच ब्रशचा वापर करणं दातांसाठी चांगलं ठरत नाही.

गंभीर आजारांचा धोका

कोलगेटच्या वेबसाइटनुसार, जर तुम्हाला व्हायरस किंवा फंगसशी संबंधित काही आजार झाला असेल तर तुम्ही बरे झाल्यानंतर ब्रश लगेच बदलावा. कोरोना व्हायरस दरम्यान अनेक डॉक्टरांनी सल्ला दिला होता की, पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांनी निगेटिव्ह झाल्यावर ब्रश बदलावा. तुमचा ब्रश इतरांच्या ब्रशसोबत ठेवत असाल तर त्यांनाही तुमचा आजार होऊ शकतो. अशात आजारादरम्यानचा ब्रश लगेच बदलावा.

योग्य टूथब्रश निवडण्यासाठी

1) टूथब्रश निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रशचे ब्रिसल्स नरम असणे. नरम ब्रिसल्स असलेल्या टूथब्रशमुळे दातांची स्वच्छता योग्य पद्धतीने करता येते. तसेच हिरड्यांनाही त्रास होत नाही. कडक टूथब्रश असल्यास हिरड्यांना त्रास होतो आणि परिणामी हिरड्यांमधून रक्त येतं.

2) टूथब्रशचं तोंड गोलाकार असेल असं पहावं आणि लहान टूथब्रश वापरण्याचा प्रयत्न करावा. लहान टूथब्रश असल्यास कोना-कोपऱ्यात पोहचण्यास मदत होते.

3) जर तुमच्या हिरड्या संवेदनशील असतील तर तुम्हाला सेंसेटिव्ह टुथब्रशची निवड करणं गरजेचं आहे. असे टूथब्रश बाजारात उपलब्ध असून याचा वापर केल्याने हिरड्यांना त्रास होत नाही. 

4) जर तुमच्या दातांची रचना एक सारखी नसेल म्हणजेच मागे–पुढे असेल तर झिक झॅक ब्रिसल्स असलेले टुथब्रश वापरणं गरजेचं आहे. सामान्य टुथब्रश वापरल्यामुळे तुमच्या दातांची योग्य पद्धतीने स्वच्छता करता येणार नाही.

5) नेहमी या गोष्टीची काळजी घ्या की, टूथब्रशच्या हँडलची लांबी कमी असावी. लांबी मोठी असल्यास तुम्ही योग्य पद्धतीने त्याचा वापर करु शकत नाही. तसेच टूथब्रश खरेदी करताना त्याची कॅपही खरेदी करा.

Web Title: When you should change your toothbrush?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.