कोणत्या स्थितीत ब्रश केल्याने दात होतात खराब, डॉक्टरांनी सांगितल्या ३ गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 03:07 PM2024-06-10T15:07:19+5:302024-06-10T15:07:47+5:30

Teeth Care : दात निरोगी ठेवण्यासाठी बरेच लोक दिवसातून दोनवेळा ब्रश करतात. पण कोणत्या स्थितीत ब्रश करू नये हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊया.

When you should not brush your teeth told dentist | कोणत्या स्थितीत ब्रश केल्याने दात होतात खराब, डॉक्टरांनी सांगितल्या ३ गोष्टी!

कोणत्या स्थितीत ब्रश केल्याने दात होतात खराब, डॉक्टरांनी सांगितल्या ३ गोष्टी!

Teeth Care : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तोंडाची चांगली स्वच्छता करणंही गरजेचं असतं. तोंडातील अनेक बॅक्टेरिया पोटात गेले तर पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. दात व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर दातांवर प्लाक जमा होतं आणि बॅक्टेरिया वाढतात. प्लाकमधील बॅक्टेरिया अ‍ॅसिड तयार करतं ज्यामुळे दातांचा वरचा थर खराब होऊ लागतो. दात निरोगी ठेवण्यासाठी बरेच लोक दिवसातून दोनवेळा ब्रश करतात. पण कोणत्या स्थितीत ब्रश करू नये हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊया.

डॉक्टर शादी मनोचेहरी यांनी दात कोणत्या स्थितीत दात ब्रश करू नये याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांच्यानुसार तीन स्थिती अशा असतात जेव्हा तुम्ही ब्रश करणं टाळलं पाहिजे. जेणेकरून दातांचं अधिक नुकसान होणार नाही. दात चांगले ठेवण्यासाठी हे करणं आवश्यक असतं.

उलटी केल्यावर

उलटी केल्यावर तोंडाची चव पूर्ण बदलते. तोंडाचा वासही येऊ लागतो. अशात बरेच लोक ब्रश करतात. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. कारण उलटी अ‍ॅसिडिक असते त्यामुळे तोंडही अ‍ॅसिडिक होतं. उलटीमधील अ‍ॅसिड दातांवर चिकटून राहतं. अशात जर तुम्ही ब्रश करत असाल तर हे अ‍ॅसिड दातांवर आणखी घासलं जातं. याने दातांच्या वरच्या थराचं नुकसान होतं. दात कमजोर होतात. उलटी केल्यावर केवळ पाण्याने गुरळा करावा.

कॉफी प्यायल्यावर

कॉफी प्यायल्यानंतर लगेच ब्रश करू नये. कॉफी सुद्धा अ‍ॅसिडिक असते. दूध आणि साखर असलेली कॉफी अधिक अ‍ॅसिडिक असते. त्यामुळे कॉफी प्यायल्यावर ब्रश केल्याने दातांचा वरचा थर खराब होतो. दात लवकर कमजोर होतात.

नाश्ता केल्यानंतर

डॉक्टर सांगतात की, नाश्ता करण्याआधी ब्रश केलं पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यावर तोंडात बॅक्टेरिया असतात. अशात जर ब्रश न करता नाश्ता केला तर बॅक्टेरिया पोटात जाता. तेच जर नाश्ता केल्यावर लगेच ब्रश केलं दाताचा वरचा थर खराब होतो.

जास्त टूथपेस्टही दातांना खराब करू शकतं. त्यामुळे ब्रश करण्यासाठी किती टूथपेस्ट वापरावी हेही महत्वाचं असतं.

किती वापरावं टूथपेस्ट

सत्य हे आहे की, दात योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी केवळ मटरच्या आकाराएवढं टूथपेस्ट वापरणं पुरेसं आहे. ६ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांबाबत सांगायचं तर टूथपेस्टचं प्रमाण हे तांदळाच्या दाण्याएवढं असायला हवं. 

एवढंच योग्य प्रमाण

दात स्वच्छ करण्यासाठी आणि चमकवण्यासाठी तुम्हाला केवळ मटरच्या दाण्याएवढंच टूथपेस्ट वापरायचं आहे. कार टूथपेस्टचा मुख्य उद्देश दातांना फ्लोराइड आणि काही प्रमाणात चमक देणे हा आहे.

Web Title: When you should not brush your teeth told dentist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.