औषधांमुळे वाढू शकतं तुमचं वजन; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 12:12 PM2024-07-20T12:12:35+5:302024-07-20T12:14:26+5:30

काही वेळा उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळेही वजन वाढतं. प्रत्येक औषधाचा काही ना काही दुष्परिणाम असतोच. अशाच काही औषधांबाबत जाणून घेऊया... 

when your weight gain is caused by medicine | औषधांमुळे वाढू शकतं तुमचं वजन; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, वेळीच व्हा सावध

औषधांमुळे वाढू शकतं तुमचं वजन; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, वेळीच व्हा सावध

आजकाल लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी हे त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, जर एखादी व्यक्ती सतत औषध घेत असेल तर त्या व्यक्तीचं वजन नक्कीच वाढू शकतं. 

काही वेळा उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळेही वजन वाढतं. प्रत्येक औषधाचा काही ना काही दुष्परिणाम असतोच. अशाच काही औषधांबाबत जाणून घेऊया... 

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानेही महिलांचं वजन वाढू लागतं. या औषधांमध्ये असलेलं प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हार्मोन्सचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात. त्यामुळे शरीरात फ्लूइड रिटेन्शन होण्यास सुरुवात होते. त्यामुळे वजन वाढू लागतं. 

मल्टी-व्हिटॅमिन औषध दीर्घकाळ घेतल्याने देखील वजन झपाट्याने वाढतं. यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. अशी औषधे शरीरात मेटाबॉलिज्म प्रोसेस एक्टिव्ह करतात. त्यामुळे लोकांना भूक लागते आणि त्यांचे वजन झपाट्याने वाढू लागते.

हाय बीपीचे रुग्णही रोज औषधे घेत असतील, तर भविष्यात हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी औषधासोबतच व्यायाम करणं देखील अत्यंत गरजेचं आहे.

मधुमेही रुग्णांचं मधुमेहावरील औषधे आणि इन्सुलिनच्या वापरामुळेही वजन वाढतं. त्यामुळे मधुमेही रुग्णाने आपल्या आहार आणि व्यायामाची विशेष काळजी घ्यावी.
 

Web Title: when your weight gain is caused by medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.