जेवल्यानंतर फळे खायची की नाही, कोणती फळे खावीत? जाणून घ्या एक्सपर्ट्स कडून...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:58 PM2021-06-25T20:58:35+5:302021-06-25T20:59:10+5:30

आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला हवीत. तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण रात्रीचे जेवण घेतो. या जेवण आणि झोपणे या मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत की नाही? मग ती कोणती खावीत?

Whether to eat fruits after eating or not, which fruits should be eaten? Learn from the experts | जेवल्यानंतर फळे खायची की नाही, कोणती फळे खावीत? जाणून घ्या एक्सपर्ट्स कडून...

जेवल्यानंतर फळे खायची की नाही, कोणती फळे खावीत? जाणून घ्या एक्सपर्ट्स कडून...

googlenewsNext

आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला हवीत. तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण रात्रीचे जेवण घेतो. या जेवण आणि झोपणे या मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत की नाही? मग ती कोणती खावीत? न्युट्रिशनिस्ट डॉ. जॉन मर्फी यांनी एमडीलिंक्स या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार याचे उत्तर आपण जाणून घेऊया...

जेवणानंतर फळ खाऊ की नये?
अनेकदा आपल्याला सांगितले जाते जेवल्यानतंर एक तरी फळ खावे. पण जेवल्यानंतर लगेचच फळ खाणे हे शरीरासाठी घातक आहे. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार, जेवणासोबत फळ खाल्ल्याने तुम्हाला पोटाच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जेवल्यानंतर फळ खाऊ नये. फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अन्न सहज पचते. परंतु सहसा आपला आहार जास्त असतो आणि पचण्यास वेळ लागतो. जर तुम्ही जेवणानंतर फळ खाल्ले तर ते खाण्यावरच अडकते आणि पचायला जास्त वेळ लागतो.
संत्र
संत्र्यामध्ये असे गुणधर्म असतात जे जेवल्यानंतर पचनक्रिया सुलभ करतात. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशिअनमध्ये असे म्हटले गेले आहे की संत्र्याच्या फळात फ्लेवॉनाईड्स असतात. जे पोटातील गॅसची समस्या कमी करते. जेव्हा तुम्ही जेवणात तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले असतील तर त्यामुळे होणारी अॅसिडिटी न सुज संत्र्यातील नारिंगिन आणि हेस्परिडिन त्यावर नियंत्रण मिळवते.
किवी
किवी हे असे फळ आहे ज्यात फॅट आणि शुगर बिलकुल नसते. त्यामुळे समजा जेवणानंतर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही किवी खाऊ शकतात. हे तुमचे शरीर सहज पचवते. या शिवाय किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यात रक्ताची कमतरता असल्यास ती भरुन निघते, मेटाबॉलिज्म वाढते. तसेच ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहते.
किन्नु
किन्नु हे असं फळ आहे जे व्हिटॅमिन्सनी भरपूर असते. त्यामुळे रात्री झोपण्यापुर्वी किन्नू खाल्ल्याचा तुम्हाला फायदाच होतो. हे फळ मेटाबॉलीजम वाढवतं. तसेच जेवणानंतर अपचन झालं असेल तर ते पचवत व गॅसही होऊ देत नाही.

Web Title: Whether to eat fruits after eating or not, which fruits should be eaten? Learn from the experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.