कोणता भात चांगला? तपकिरी कि पांढरा? तज्ज्ञांनी दुर केले गैरसमज, सांगितलं सत्य; घ्या जाणून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 05:48 PM2021-12-19T17:48:00+5:302021-12-19T17:50:33+5:30
लोकांच्या मनात अनेकदा गोंधळ होतो की पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ कोणता? एक तांदूळ दुसर्यापेक्षा खरोखरच चांगला आहे की फक्त एक मान्यता आहे. न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे.(Best Rice)
आपल्या देशात तांदूळ आवडणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. दक्षिण भारतात रोट्यापेक्षा याला जास्त प्राधान्य दिले जाते. कारण तांदळात अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक मानले जातात. पण लोकांच्या मनात अनेकदा गोंधळ होतो की पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ कोणता? एक तांदूळ दुसर्यापेक्षा खरोखरच चांगला आहे की फक्त एक मान्यता आहे. न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे.(Best Rice)
पांढरा आणि तपकिरी तांदूळ म्हणजे काय ?
पोषणतज्ञ भुवन यांनी लिहिले, सर्व पांढरे तांदूळ पॉलिश होण्यापूर्वी ते तपकिरी असतात. फक्त पॉलिश न केलेला तांदूळ ब्राऊन राईस म्हणून विकला जातो. तपकिरी तांदूळ संपूर्ण धान्य आहे तर पांढरा तांदळावर प्रक्रिया केली जाते. तांदळाच्या दाण्याला पॉलिश केल्यावर त्यातील कोंडा आणि कोंबांचा काही भाग काढून टाकला जातो. तांदळाचा अंकुरलेला भाग हा एक भाग आहे ज्यामध्ये भरपूर खनिजे असतात आणि कोंडा फायबरने समृद्ध असतो. पॉलिश केल्यानंतर पांढऱ्या तांदळातून फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे काढून टाकली जातात.
तपकिरी आणि पांढरा तांदूळ कोणता चांगला आहे ?
पोषणतज्ञ भुवन यांनी पुढे लिहिले की 'शिजवलेल्या पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ७० पेक्षा जास्त आणि तपकिरी तांदळाचा ५० पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की पांढर्या तांदळाच्या तुलनेत तपकिरी तांदूळ रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवत नाही आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. तथापि, फायबरच्या कमतरतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
भुवन सांगतात की, बहुतेक लोक जेवणात फक्त पांढरा भात खाणे पसंत करतात, त्यामुळे आवश्यक प्रमाणात फायबर शरीरात पोहोचत नाही. म्हणून, आपण आपल्या आहारात कोणत्याही गोष्टीचा समावेश करू नये, ज्यामध्ये फक्त कॅलरीज असतात आणि कोणतेही पोषक तत्व नसतात.
ब्राऊन राइसला प्राधान्य देणे आवश्यक आहे :- न्यूट्रिशनिस्ट भुवन यांनी शेवटी लिहिले की, ' १९व्या दशकाच्या सुरुवातीला ब्राऊन राईसच्या तुलनेत जास्त पांढरे तांदूळ खाल्ल्याने बेरीबेरी रोगाचा प्रसार होऊ लागला, कारण त्यामुळे लोकांमध्ये व्हिटॅमिन बी1ची कमतरता निर्माण झाली. विशेषतः त्या लोकांमध्ये ज्यांचे मुख्य अन्न भात होते. त्यामुळे पांढऱ्या तांदळापेक्षा तपकिरी तांदळाला प्राधान्य देणे हा आरोग्याचा कल नसून तो आपल्या मुळांकडे परतण्याचा एक मार्ग आहे.'