कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा असतो मोठा धोका, जाणून घ्या आणि वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 01:16 PM2022-12-19T13:16:28+5:302022-12-19T13:18:49+5:30

Blood Group And Heart Attack: एका रिसर्चच्या रिपोर्टनुसार, एका खास ब्लड ग्रुपच्या लोकांना हृदयासंबंधी आजार होण्यासोबतच हार्ट अटॅकचा धोका जास्त राहतो. जर तुमचाही ब्लड ग्रुप हाच असेल तर वेळीच सावध व्हा.

Which blood group have the highest risk of heart attack know and be alert | कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा असतो मोठा धोका, जाणून घ्या आणि वेळीच व्हा सावध!

कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा असतो मोठा धोका, जाणून घ्या आणि वेळीच व्हा सावध!

Next

Blood Group And Heart Attack: बदलती लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल आरोग्यासंबंधी अनेक समस्या होताना दिसत आहे. सगळ्यात जास्त धोका हार्ट अटॅकचा वाढत आहे. यासोबतच कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा कमी होणं, डायबिटीससारख्या समस्यांनी लोक हैराण आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चच्या रिपोर्टनुसार, एका खास ब्लड ग्रुपच्या लोकांना हृदयासंबंधी आजार होण्यासोबतच हार्ट अटॅकचा धोका जास्त राहतो. जर तुमचाही ब्लड ग्रुप हाच असेल तर वेळीच सावध व्हा.

ABO सिस्टमचा वापर

हेल्थ रिसर्चच्या रिपोर्टनुसार, ब्लड ग्रुपची योग्य माहिती असल्यावर हृदयासंबंधी आजारांच्या धोक्याबाबत अंदाज लावता येऊ शकतो. ही माहिती मिळवण्यासाठी ABO सिस्टमचा वापर केला जातो. यात एंटीजनच्या हिशेबाने रक्त वेगवेगळ्या गटात विभागलं जातं. ही सिस्टीम 1901 मध्ये ऑस्टेलियाच्या इम्यूनोलॉजिस्ट कॉर्ल लॅंडस्टीनरमध्ये केली होती.

आपल्या शरीरातील लाल रक्त पेशी याच प्रोटीन घेण्याचं किंवा न घेण्याचं काम करतात. आणि या हिशेबानुसार त्यांच्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इफेक्टची माहिती मिळते. जर रक्तात प्रोटीन असेल तर याचा अर्थ आहे की, व्यक्ती आरएच पॉझिटिव्ह आहे आणि जर प्रोटीन नसेल तर याचा अर्थ आहे की, आरएच निगेटिव्ह आहे. ओ (O) ब्लड ग्रुप असलेले लोक कुणालाही आपलं रक्त देऊ शकतात आणि AB ग्रुप असलेल्या लोकांना कोणत्याही व्यक्तीचं रक्त दिलं जाऊ शकतं.

2020 मध्ये अमेरिकन हार्ट एसोसिएशन जर्नलमध्ये पब्लिशच्या एका रिसर्च रिपोर्टनुसार, ए आणि बी ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना थ्रोम्बोम्बोलिकची समस्या होण्याचा सगळ्यात जास्त धोका राहतो आणि तेच ओ ब्लड ग्रुपच्या लोकांना काळानुसार हाय ब्लड प्रेशरची समस्या होण्याचा धोका असतो. हृदय आणि ब्लड ग्रुपबाबत करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आलं की, ए ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये एथेरोस्क्लेरोसिस, हाइपरलिपिडिमिया आणि हार्ट फेल होण्याचा धोका ओ ब्लड ग्रुप असलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त असतो. बी ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो.

Web Title: Which blood group have the highest risk of heart attack know and be alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.