'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो ब्रेन स्ट्रोकचा अधिक धोका, एक्सपर्टनी दिला खास सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 11:51 AM2024-11-02T11:51:45+5:302024-11-02T11:52:28+5:30
रिसर्चनुसार, काही खास ब्लड ग्रुपच्या लोाकांना लवकर स्ट्रोक येण्याचा धोका असतो. म्हणजे ६० वयाच्या आधीच स्ट्रोक येऊ शकतो.
ब्रेन स्ट्रोक ही एक गंभीर आणि जीवघेणी समस्या आहे. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका खासप्रकारचा ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक राहतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झाला आहे.
यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंड स्कूल ऑफ मेडिसीन (UMSOM) च्या अभ्यासकांनी हा रिसर्च केला. याचा रिपोर्ट न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. रिसर्चनुसार, काही खास ब्लड ग्रुपच्या लोाकांना लवकर स्ट्रोक येण्याचा धोका असतो. म्हणजे ६० वयाच्या आधीच स्ट्रोक येऊ शकतो.
काय सांगतो रिसर्च?
रिसर्चमध्ये आधी करण्यात आलेल्या ४८ रिसर्चच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. अभ्यासकांनी जवळपास ६ लाख अशा लोकांचा डेटा चेक केला ज्यांना स्ट्रोक झाला नव्हता. तसेच १७ हजार अशा लोकांचा डेटा चेक केला ज्यांना इस्केमिक स्ट्रोक झाला होता. ज्यांना हा स्ट्रोक आला होता त्यांचं वय ६० पेक्षा कमी होतं.
रूग्णांचा आनुवांशिक डेटा चेक केल्यावर अभ्यासकांना आढळलं की, एका खास ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये आणि स्ट्रोकमध्ये संबंध आहे. त्यांना आढळलंकी, इतर कोणत्याही ब्लड ग्रुपच्या तुलनेत A ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये सुरूवातीच्या स्ट्रोक धोका अधिक असतो. O ब्लड ग्रुपच्या लोकांनाही धोका असतो, पण कमी असतो.
A ब्लड ग्रुपच्या लोकांना स्ट्रोकचा अधिक धोका
रिसर्चमध्ये आढळून आलं की, इतर ब्लड ग्रुपच्या लोकांच्या तुलनेत A ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना वेळेआधीच स्ट्रोक येण्याचा धोका १६ टक्के अधिक असतो. दुसरीकडे असं गरजेचंही नाही की, A ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना स्ट्रोल येईलच. मात्र, रिसर्चमधून हे दिसतं की, स्ट्रोकचा सामना करणाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त याच ब्लड ग्रुपचे लोक होते.
सगळ्यात सुरक्षित कोण?
सगळ्यात प्रचलित ब्लड ग्रुप O च्या लोकांना याचा सगळ्यात कमी धोका असतो. या ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये इतर ब्लड ग्रुपच्या तुलनेत वेळेआधी स्ट्रोकचा धोका १२ टक्के कमी असतो.
ब्लड ग्रुप A असलेल्यांना सल्ला
ब्लड ग्रुप A असलेल्या लोकांना स्ट्रोक धोका जास्त आहे. मात्र, अभ्यासकांनी या गोष्टीवर जोर दिला की, हा फार जास्त नाहीये. ज्याचा ब्लड ग्रुप A आहे, त्यांनी घाबरू नये किंवा असाही विचार करू नये की, त्यांना स्ट्रोक येईलच. त्याऐवजी लोकांनी संभावित धोक्याबाबत सजग असलं पाहिजे. यापासून बचाव करण्यावर फोकस केला पाहिजे. जसे की, हेल्दी लाइफस्टाईल, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरवर लक्ष ठेवलं पाहिजे.