कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यात हार्ट अॅटॅकचा धोका जास्त, वाचा तज्ञांच मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 04:06 PM2021-06-04T16:06:46+5:302021-06-04T16:24:45+5:30
हृदयविकार हा धोकादायक आजार आहे. स्वीडनमध्ये यावर आता संशोधन करण्यात आलं. त्या संशोधनात नेमकं कोणत्या दिवशी आणि महिन्यात हार्ट अॅटॅक येऊ शकतो हे समोर आलंय.
आपल्या शरीराशी संबधित असे अनेक आजार आहेत ज्यावर मात करणं आपल्याला कठीण जाऊ शकतो. हृदयविकार हा असाच एक धोकादायक आजार आहे. मात्र स्वीडनमध्ये यावर आता संशोधन करण्यात आलं. त्या संशोधनात नेमकं कोणत्या दिवशी आणि महिन्यात हार्ट अॅटॅक येऊ शकतो हे समोर आलंय.
पाहुया या संशोधकांनी नेमकं काय म्हटलं?
हार्ट अॅटॅकचं महत्वाचं कारण म्हणजे तणाव. डायबेटीस असणाऱ्या रुग्णांना तर हार्ट अॅटॅकचा धोका सर्वात जास्त असतो.
या संशोधनात तब्बल १.५ लोकांवर संशोधन करण्यात आले. या रिसर्चनुसार सोमवारी हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता जास्त असते. इतर दिवसांच्या तुलनेत ११ टक्के सोमवारी हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण जास्त असते. तरुण तसेच नोकरीधंदा करणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्ट अॅटॅकचे प्रमाण जास्त असते. वर म्हटल्याप्रमाणे तणावाचा हार्ट अॅटॅकशी जास्त संबध असतो. सोमवारी कोणत्याही ऑफिसचा पहिला दिवस असतो. त्यावेळी सहाजिकच कामाचा ताण जास्त असतो. त्यामुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. तसेच शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये हार्ट अॅटॅकचा धोका कमी असल्याचे समोर आले. तर महिन्यांचं बोलायचं झाल्यास डिसेंबर महिन्यामध्ये हार्टअॅटॅकचं प्रमाण जास्त असतं. तर जून महिन्यात कमी असल्याचं दिसून येतं.
हे सर्व जरी खरे असले तरी उत्तम जीवनशैली, योग्य डाएट आणि औषधोपचार यांनी हार्ट अॅटॅकचा धोका कमी होतो.