Health tips: नारळ पाणी कि लिंबु पाणी, उन्हाळ्यात सर्वात जास्त उत्तम काय? जाणून घ्या याचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 04:54 PM2022-05-03T16:54:08+5:302022-05-03T16:56:36+5:30

लिंबु पाणी की नारळपाणी सर्वात जास्त चांगलं पेयं कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी या दोन्ही पेयांचे फायदे जाणून घेऊ...

which drink is better? coconut water or lemon water, know the answer | Health tips: नारळ पाणी कि लिंबु पाणी, उन्हाळ्यात सर्वात जास्त उत्तम काय? जाणून घ्या याचे उत्तर

Health tips: नारळ पाणी कि लिंबु पाणी, उन्हाळ्यात सर्वात जास्त उत्तम काय? जाणून घ्या याचे उत्तर

googlenewsNext

गरमीचा मौसम म्हटला की लिंबु पाणी आणि नारळ पाणी मोठ्याप्रमाणावर प्यायले जाते. दोन्ही पेयं गरमीत अत्यंत फायद्याची मानली जातात. उन्हाळ्यात तर याचे सर्सास सेवन केले जाते. मग अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की लिंबु पाणी की नारळपाणी सर्वात जास्त चांगलं पेयं कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी या दोन्ही पेयांचे फायदे जाणून घेऊ...

नारळ पाण्याचे फायदे
नारळ पाण्यात सोडियम, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते. नारळ पाणी इम्युनिटी बुस्टर आहे. ते तुम्हाला हायड्रेड ठेवते. बीपीच्या रुग्णांसाठी नारळ पाणी वरदान आहे. फॅट फ्री असल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठीही नारळ पाण्याचा फायदा होतो.

नारळ पाणी कोणी पिऊ नये?
डायबिटीसच्या रुग्णांनी नारळ पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण नारळपाण्यात मोठ्या प्रमाणात ग्लुकोज असते.

लिंबु पाण्याचे फायदे
लिंबु पाण्यात व्हिटॅमिन सी मोठ्याप्रमाणावर असते तसेच यात लोह अन् पोटॅशियमही असते. लिंबु पाणी जास्तवेळा साखर मिसळून प्यायले जाते. पण ते चुकीचे आहे.

लिंबु पाणी कसे प्यावे?
लिंबु पाणी फक्त लिंबुच पाण्यात मिसळून प्यावे. त्यात तुम्ही थोडेसे मीठ घालु शकता. लिंबु पाणी रिकाम्या पोटी पिऊ नये. लिंबु रस गरम पाण्यात मिसळून पिऊ नये. गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने अ‍ॅसिड तयार होते. जे तुमच्या हाडांना कमकुवत करु शकते.

दोघांमध्ये काय उत्तम?
खरंतर दोघांमध्ये असलेले गुणधर्म जवळ जवळ सारखेच आहेत. दोन्हीही गरमीत शरीराला हायड्रेट ठेवतात. दोघांचेही फायदे तितकेच आहेत. म्हणून दोन्ही पेय तितकेच उत्तम आहेत.

Web Title: which drink is better? coconut water or lemon water, know the answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.