केस वाढवण्यासाठी आणि चमकदार करण्यासाठी कोणतं तेल बेस्ट? जाणून घ्या कसं वापराल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 03:58 PM2024-07-20T15:58:46+5:302024-07-20T16:10:14+5:30
Hair Care Tips : फक्त तेल लावून केसांना फायदा होतो असं नाही तर तेल कधी, कसं आणि किती वेळ लावावं हेही माहीत असायला हवं. सोबतच याचीही माहिती असली पाहिजे की, तुमच्या केसांसाठी कोणतं तेल फायदेशीर आहे.
Hair Care Tips : जास्तीत जास्त लोकांना आजकाल केसगळती किंवा केसांसंबंधी इतर समस्या होत आहेत. अशात लोक वेगवेगळे उपाय करतात. वेगवेगळे तेल लावतात. पण अनेकांना नेमकं काय करावं हे माहीत नसतं. केसांना तेल लावण्याचे फायदे सर्वांनाच माहीत असतात. पण फक्त तेल लावून केसांना फायदा होतो असं नाही तर तेल कधी, कसं आणि किती वेळ लावावं हेही माहीत असायला हवं. सोबतच याचीही माहिती असली पाहिजे की, तुमच्या केसांसाठी कोणतं तेल फायदेशीर आहे. चला याबाबतच काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कशी घ्याल केसांची काळजी?
१) केसांना तेल लावण्याआधी तेल हलकं गरम करावं. कोमट तेल केसांसाठी फॉलिकल्स उत्तेजित करण्यास मदत करतात. त्यामुळे केसांना नेहमी कोमट तेल लावा. साधं तेल लावण्यापेक्षा कोमट तेलाचा फायदा तुम्हाला अधिक बघायला मिळेल.
२) अनेकजण केसांवर तेल ओततात, पण ही केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत अजिबात नाही. एका बाउलमध्ये कोमट तेल घ्या, नंतर बोटांच्या मदतीने तेल केसांना आणि केसांच्या मूळांना लावा. डोक्याच्या त्वचेलाही व्यवस्थित तेल लावा.
३) जेवढी गरज आहे तेवढंच तेल केसांना लावा. तुम्हाला वाटत असेल की, जास्त तेल लावल्याने जास्त फायदा होईल तर तुम्ही चुकताय. जास्त तेल लावाल तर केस धुतांना शॅम्पूचा जास्त वापर करावा लागेल.
४) केसांना तेल लावताना मसाज करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तेल लावताना १० ते १५ मिनिट हलक्या हाताने डोक्याच्या त्वचेची मसाज करा. मसाज केल्याने डोक्याच्या त्वचेमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो आणि केसांना पोषण मिळतं.
५) चांगल्या रिझल्टसाठी केसांना रात्रभर तेल लावून ठेवा. याने तुम्हाला पुरेसा फायदा होईल. जर तुम्ही रात्रभर केसांना तेल लावून ठेवत नसाल तर निदान दोन ते तीन तास केसांना तेल लावून ठेवा.
६) तेल लावल्यावर केसांना शक्य असेल तर वाफ द्यावी. याने केस सुकण्यास मदत होईल. केसांना वाफ देण्यासाठी टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि तो १० मिनिटांसाठी केसांना बांधून ठेवा. असं करताना टॉवेल फार जास्त गरम असू देऊ नका.
७) वाफ दिल्यानंतर केस धुवावे. शॅम्पूची निवड तुमच्या केसांनुसार करावी. जर केस ऑयली असतील तर ऑयली केसांसाठी फायदेशीर शॅम्पू खरेदी करा. जर केस ड्राय असतील तर तसा शॅम्पू खरेदी करा.