पायी चालताना अनेकदा 'ही' मोठी चूक करतात लोक, जाणून घ्या योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:42 AM2024-09-23T11:42:42+5:302024-09-23T11:43:13+5:30

Walking Method : जास्तीत जास्त लोक सकाळी आणि सायंकाळी वॉक करायला जातात. वॉक करण्याचे म्हणजे पायी चालण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. पायी चालल्याने शरीर तर फीट राहतंच सोबतच मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. 

Which walk is good for health walking alone or walking with someone | पायी चालताना अनेकदा 'ही' मोठी चूक करतात लोक, जाणून घ्या योग्य पद्धत!

पायी चालताना अनेकदा 'ही' मोठी चूक करतात लोक, जाणून घ्या योग्य पद्धत!

Walking Method : बरेच लोक फीट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाईज करतात. काही लोक जिममध्ये जाऊन शरीर फीट ठेवतात तर काही लोक घरीच हलके व्यायाम करतात. जास्तीत जास्त लोक सकाळी आणि सायंकाळी वॉक करायला जातात. वॉक करण्याचे म्हणजे पायी चालण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. पायी चालल्याने शरीर तर फीट राहतंच सोबतच मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. पण तुम्हाला वॉक करण्याची योग्य पद्धत माहीत असणं आवश्यक आहे. 

तुम्ही वॉक करत असाल तर एकटे वॉक करता की पार्टनरला सोबत घेऊन वॉक करता? जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याचा काय संबंध? तर याचेही अनेक फायदे असतात. 

पार्टनरसोबत वॉक करण्याचे फायदे

जर तुम्ही रोज पार्टनरसोबत वॉक करत असाल तर याने तुम्हाला मोटिव्हेशन मिळतं. खासकरून जेव्हा तुम्ही वॉकची नव्याने सुरूवात करत असाल तर याने तुम्हाला पुढील प्रवास चांगला करण्यास मदत मिळते. 

वयोवृद्धांसाठी कोणता वॉक सुरक्षित

रोज वॉक करताना सरक्षेची देखील काळजी घेणं आवश्यक असतं. जास्त वय असलेल्या लोकांनी नेहमीच पार्टनरसोबत वॉक केलं पाहिजे. याने तुम्हाला सुरक्षित वाटेल आणि न घाबरता तुम्ही वॉक करू शकाल.

आत्मविश्वास वाढतो

मोकळ्या हवेत वॉक केल्याने शारीरिक रूपाने आपल्याला चांगलं वाटतं. सोबतच याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही चांगला प्रभाव पडतो. जर तुम्ही एखाद्या मित्रासोबत किंवा पार्टनरसोबत वॉक करत असाल याने तुमच्यातील बॉन्ड आणखी मजबूत होतो. काही लोकांसाठी एक्सरसाईज करणं फार अवघड असतं. अशात तुम्ही कुणासोबत वॉक करत असाल तर याने कंटाळाही येणार नाही आणि तुमचा वेळ सहज निघून जाईल.

कोणत्या गोष्टींची घ्याल काळजी?

पार्टनरसोबत वॉक करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सगळ्यात आधी तर जास्त बोलणं टाळावं. कारण याने तुमचा श्वास भरून येतो आणि यामुळे तुम्ही लवकर थकाल. जास्त बोलचाल केल्याने तुम्ही वॉकवर व्यवस्थित फोकस करू शकणार नाही. त्यासोबतच तुम्हाला पार्टनरचा स्पीड मॅच करणंही अवघड होईल.

एकट्याने वॉक करणे...

एक्सपर्ट्सनुसार, एकट्याने वॉक करणं जास्त फायदेशीर ठरतं. एकटे असताना तुम्ही वॉकवर जास्त फोकस करू शकता आणि याने तुमच्या मेंदुवरही चांगला प्रभाव पडतो. पार्टनरसोबत वॉक करणं अनेकदा अवघड ठरतं. अनेकदा लोक बोलता बोलता आपला स्पीड कमी करतात आणि आरोग्याच्या दृष्टीने हे अजिबात बरोबर नाही. 

Web Title: Which walk is good for health walking alone or walking with someone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.