UTI इन्फेक्शन म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं आणि कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 03:37 PM2018-11-07T15:37:09+5:302018-11-07T15:39:33+5:30

यूरिन इन्फेक्शन म्हणजेच UTI ही महिलांमध्ये दिसणारी सामान्य समस्या आहे असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. 100मधील 80 टक्के महिला या इन्फेक्शनने त्रस्त असतात.

which women have urine infections and how to protect | UTI इन्फेक्शन म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं आणि कारणं!

UTI इन्फेक्शन म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं आणि कारणं!

googlenewsNext

यूरिन इन्फेक्शन म्हणजेच UTI ही महिलांमध्ये दिसणारी सामान्य समस्या आहे असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. 100मधील 80 टक्के महिला या इन्फेक्शनने त्रस्त असतात. याचे मुख्य कारण म्हणजे जास्त वेळ यूरीन थांबवून ठेवणं हे आहे. जेव्हा मुत्राशयामध्ये बॅक्टेरिया जमा होतात. त्यावेळी यूरिनमार्फत इन्फेक्शन यूट्रसपर्यंत पोहोचतं. ज्यामुळे अनेकदा गरोदरपणातही अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही समस्या फार गंभीर रूप धारण करू शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

काय आहे यूरिन इन्फेक्शन?

यूरिन इन्फेक्शन कोणत्याही वयामध्ये होऊ शकते. ज्या व्यक्ती जास्तीत जास्त वेळ यूरीन थांबवून ठेवतात त्यांना या समस्येचा सामना करावा लागू शकतो. कारण यूरीनमधून बॅक्टेरिया शरीरात जमा होऊन इन्फेक्शन होतं करतात. त्यामुळे अनेकदा गुप्तांगात खाज आणि जळजळ होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

यूरिन इन्फेक्शनची कारणं :

1. मसालेदार पदार्थांचं सेवन 

ज्या व्यक्ती मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातात त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. 

2. जास्त औषधांचं सेवन 

अनेकदा इतर आजारांसाठी औषधं घ्यावी लागतात. त्यांना अनेकदा यूरीन इन्फेक्शनच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे दूषित पाण्याचे सेवन करमं हेदेखील एक कारण ठरू शकतं. 

3. अस्वच्छ बाथरूमचा वापर करणं

अनेकदा अस्वच्छ बाथरूमचा वापर करणं हेदेखील यूरिन इन्फेकशनचं कारण ठरू शकतं. अस्वच्छ टॉयलेट सीटवर अनेकदा बॅक्टेरीया असतात. अशा टॉयलेट सीटचा वापर केल्याने यूरिन इन्फेक्शनसारखे अनेक आजार होऊ शकतात. 

4. किडनी स्टोन होणं

किडनी स्टोन हेदेखील यूरिन इन्फेक्शनचे मोठे कारण ठरते. ज्या व्यक्ती किडनी स्टोनच्या समस्येचा सामना करत असतील त्यांनी स्वतःची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. 

5. शरीरात पाण्याची कमतरता 

शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्याने यूरिन इन्फेक्शन होते. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. 

यूरिन इन्फेक्शनची लक्षणं :

यूरिन इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात अनेक बदल घडून येतात. या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- यूरिनमधून दुर्गंधी येणं
- कमरेच्या खालच्या भागामध्ये वेदना होतात.
- सतत लघवीला होणं
- भूख न लागणं
- थकवा येणं
- यूरिनचा रंग बदलणं

वरील लक्षणं तुमच्या शरीरात दिसल्यास यूरिन टेस्ट करून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधांसोबतच काही घरगुती उपायही तुम्हाला मदत करतील.

1. गोमुखासन योगा

महिलांसाठी हे आसन फार लाभदायक आहे. यूरिन इन्फेक्शनपासून लवकर सुटका करून घेण्यासाठी गोमुखासन मदत करेल. 

2. क्रेनबेरी ज्यूस पिणं फायदेशीर

दररोज एक ग्लास क्रेनबेरीचा ज्युस पिणं फायदेशीर ठरतं. इन्फेक्शन दूर ठेवण्यासाठी 3 ते 4 दिवस याचे सेवन केल्याने आराम मिळेल. 

3. गरम पाण्याने शेक द्या. 

यूटीआय इन्फेक्शनपासून सुटका करून घेण्यासाठी पोटाला गरम पाण्याने शेक देणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे सूज देखील कमी होते.

 4. लसूण

लसणामध्ये असलेले पोषक घटक अनेक इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी मदत करतात. दररोज रिकाम्या पोटी लसणाच्या पाकळ्यांचं पाण्यासोबत सेवन केल्याने शरीराला फायदा होतो. याव्यतिरिक्त जेवणामध्ये लसणाचा समावेश करणंही फायदेशीर ठरतं. 

Web Title: which women have urine infections and how to protect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.