White Hair Problem: या तीन घरगुती उपायांनी दूर करा पांढऱ्या केसांची समस्या, जाणून घ्या पद्धत...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:35 PM2022-06-07T13:35:23+5:302022-06-07T13:35:45+5:30
White Hair Problem: आम्ही तुमच्यासाठी वर्षानुवर्षे चालत आलेले काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमची पांढऱ्या केसांची समस्या दूर होऊ शकते. चला जाणून घेऊ अॅलोवेरा, कॉफी आणि कढीपत्त्याने केस काळे कसे करता येईल.
White Hair Problem: बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि चुकीच्या सवयींमुळे जास्तीत जास्त लोकांचे केस कमी वयातच पांढरे होतात. अशात ही समस्या दूर करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक उपाय आहेत. पण काही लोक घरगुती उपायांवर जास्त विश्वास ठेवतात. अशात आम्ही तुमच्यासाठी वर्षानुवर्षे चालत आलेले काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमची पांढऱ्या केसांची समस्या दूर होऊ शकते. चला जाणून घेऊ अॅलोवेरा, कॉफी आणि कढीपत्त्याने केस काळे कसे करता येईल.
कढीपत्त्याने केस करा काळे
कढीपत्त्याने पांढऱ्या केसांची समस्या सोडवली जाऊ शकते. यासाठी कढीपत्त्याची काही पाने घेऊन ते बारीक करा. त्यात दोन ते तीन चमचे आवळा पावडर आणि ब्राम्ही पावडर टाकून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत लावा. एक तास ही पेस्ट केसांना लावून ठेवा. याचा फायदा तुम्ही लगेच दिसू लागले. याने केस काळेही होतील आणि मजबूही होती.
अॅलोवेराने केस करा काळे
अॅलोवेरानेही केस काळे केले जाऊ शकतात. यासाठी आठवड्यातून दोन वेळा अॅलोवेरा केसांना लावा. हा हेअर पॅक तयार करण्यासाठी अॅलोवेरा जेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस टाका. ही पेस्ट केसांच्या मुळापासून लावा. काही वेळाने केस चांगले स्वच्छ करा.
चहा पावडर आणि कॉफीने केस करा काळे
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, कॉपफीच्या पावडरने केल हलके ब्राउन होतात. अजून चांगला परिणाम मिळवण्यासाठी कॉफीमध्ये चहा पावडर मिक्स करा. यासाठी गरम पाण्यात तीन टी बॅग टाका आणि त्यानंतर 3 चमचे कॉफी पावडर मिक्स करा. हे मिश्रण साधारण 5 मिनिटे उकडून घ्या. जेव्हा हे मिश्रण चांगल्या प्रकारे थंड झालं तर ब्रशच्या मदतीने केसांना लावा. दोन तासांनी केस धुवून घ्या.