अवघ्या जगाचे डोळे कोरोना लसीकडे; WHO च्या तज्ज्ञांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 11:39 AM2020-08-10T11:39:44+5:302020-08-10T11:45:12+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाचा प्रसार आणि लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी सुचना दिल्या आहेत.

Who chief warned about covid 19 vaccine said dont expect to much from vaccine | अवघ्या जगाचे डोळे कोरोना लसीकडे; WHO च्या तज्ज्ञांचे मोठं विधान

अवघ्या जगाचे डोळे कोरोना लसीकडे; WHO च्या तज्ज्ञांचे मोठं विधान

Next

कोरोनाच्या माहामारीनं संपूर्ण देश त्रस्त आहे. कोरोना व्हायरसने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हाहाकार निर्माण केला आहे. अशातच कोरोनाचा प्रसार आणि लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी सुचना दिल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहोम घेब्रेयसिस यांनी दिलेल्या माहितीनुसार लस ही कोणतीही चमत्कारीक गोळी नाही की ज्यामुळे कोरोना व्हायरस लगेच नष्ट होईल. या व्हायरसचा सामना करण्यासाठी मोठा कालावधी लागणार असून आपण सगळ्यांनी मिळून या व्हायरसला हरवायचं आहे.

जगभरातील ६ पेक्षा जास्त देशांतील लसीच्या चाचण्या सकारात्मक झाल्या आहेत. अनेक लसी या चाचण्या पूर्ण करून मानवी परिक्षणाच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. असंच एक विधान अमेरिकेतील संक्रामक रोगतज्ज्ञ डॉ एंथोनी स्टीफन फॉसी यांचे वरिष्ठ सल्लागार डेविड मारेंस यांनी केलं आहे.  त्यांनी सांगितले की, लस तयार करण्याची क्रिया एखाद्या अंधारात प्रक्रिया करण्याप्रमाणे आहे. सुरूवातीला याचे चांगले परिणाम दिसून आले तरीही पुढे लस परिणामकारक ठरेल की नाही याबाबत कोणतीही माहिती देता येत नाही. तसंच शेवटच्या टप्प्यात लस किती सकारात्मक प्रतिसाद देईल याची खात्री नसते.

अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील मिलकेन इंस्टीट्यूट ऑफ पब्लिक हेल्थमधील जागतिक आरोग्य सहाय्याक प्राध्यापक आणि वॅक्सीनोलॉजिस्ट जॉन एंड्रस यांनीसुद्धा लसीच्या परिक्षणाबाबत शंका व्यक्त केली  आहे.  कोरोनाची लस तयार करणं आपल्याला वाटतं आहे  तितकं सोपं नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  कारण ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. 

दरम्यान जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही जवळपास दोन कोटींच्या वर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने तब्बल 22 लाखांचा टप्पा पार केला असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या ही 22,15,075 पर्यंत पोहोचली आहे. 

देशात आतापर्यंत तब्बल 15 लाखांहून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी दिली आहे. 10 राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक असून देशातील 80 टक्के रुग्ण या राज्यांमधील असल्याचंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता देशातील कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. 24 तासांत सात लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

CoronaVirus : आजारी असूनही लक्षणं नसलेल्या रुग्णांवर कोरोनाचा 'असा' होतोय परिणाम, वेळीच सावध व्हा

लढ्याला यश! रक्ततपासणीने कोरोना रुग्णांना मृत्यूचा धोका कितपत हे कळू शकणार, तज्ज्ञांचा दावा

पावसाळ्यात वाढताहेत सर्दी, खोकल्याच्या समस्या; बचावासाठी आयुष मंत्रालयानं सांगितले 'हे' उपाय

Web Title: Who chief warned about covid 19 vaccine said dont expect to much from vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.