WHO चा सल्ला डायबिटीसचा धोका टाळण्यासाठी करा 'हा' उपाय, लगेच होईल फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 10:17 AM2024-02-07T10:17:19+5:302024-02-07T10:18:17+5:30
Diabetes : आयडीएफनुसार, टाइप 2 डायबिटीस आजार जगात सगळ्यात जास्त वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावर ठोस असा काही उपाय नाही.
Diabetes : डायबिटीस एक अशी समस्या आहे जी लगेच समजून येत नाही. हा आजार हळूहळू तुमच्या शरीरात वाढतो. धुम्रपान न केल्यास याचा धोका कमी होऊ शकतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO, इंटनॅशनल डायबिटीस फेडरेशन (IDF) आणि न्यूकॅसल विश्वविद्यालय द्वारे संयुक्तपणे करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, धुम्रपान सोडल्याने टाइप 2 डायबिटीसचा धोका 30 ते 40 टक्के कमी होऊ शकतो.
आयडीएफनुसार, टाइप 2 डायबिटीस आजार जगात सगळ्यात जास्त वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावर ठोस असा काही उपाय नाही. टाइप 2 डायबिटीस आपल्या लाइफस्टाईलमध्ये बदल करून रोखला जाऊ शकतो. धुम्रपान सोडल्याने टाइप 2 डायबिटीसचा धोका कमी करता येऊ शकतो.
फुप्फुसांचा कॅन्सर
दुसऱ्या इतर कॅन्सरच्या तुलनेत फुप्फुसांच्या कॅन्सरमुळे जास्त लोकांचा मृत्यू होतो. सिगारेटमुळे फुप्फुसांचा कॅन्सर होऊन 90 टक्के लोकांचा जीव जातो.
सीओपीडी
या समस्येत श्वास घेण्यास समस्या होते. सीओपीडीची समस्या जवळपास 85 टक्के ते 90 टक्के सिगारेटमुळे होते.
ब्रेन स्ट्रोक
जर कुणी दिवसातून 20 सिगारेट ओढत असेल तर त्यांना सिगारेट न ओढणाऱ्यांच्या तुलनेत स्ट्रोक येण्याचा धोका सहा टक्के जास्त असतो.
डिमेंशिया
जास्त सिगारेट ओढल्याने डिमेंशिया म्हणजे मनोभ्रंश रोग होण्याचा धोका वाढतो तसेच स्मरणशक्ती कमी होण्याचा धोकाही राहतो.
दातांची समस्या
जास्त सिगारेट ओढल्याने दातांचं वय कमी होऊ शकतं. दातांचां रंग पिवळा किंवा काळा होतो. तसेच तोंडाची समस्याही होऊ शकते.