'या' लोकांना कोलन संक्रमणाचा जास्त असतो धोका....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 01:41 PM2020-04-30T13:41:56+5:302020-04-30T13:52:16+5:30

कोलन म्हणजे मोठ्या आतड्यांना झालेलं इन्फेक्शन याला कोलाइटिस असंही म्हणतात.

Who is at high risk of colon infection why irfan khan died know the reason myb | 'या' लोकांना कोलन संक्रमणाचा जास्त असतो धोका....

'या' लोकांना कोलन संक्रमणाचा जास्त असतो धोका....

googlenewsNext

बॉलिवुडचे प्रसिध्द अभिनेते इरफान खान यांचा काल कोलन इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला. कोलन इन्फेक्शन म्हणजे नक्की काय आणि कोलन इन्फेक्शनचा धोका कोणाला जास्त असतो. याबाबत आम्ही आज सांगणार आहोत. हेल्थलाइनने दिलेल्या माहितीनुसार, कोलन म्हणजे मोठ्या आतड्यांना झालेलं इन्फेक्शन याला कोलाइटिस असंही म्हणतात. बॅक्टेरिया व्हायरस, किंवा पॅरासाइट्समुळे हे इन्फेक्शन  होऊ शकतं.

कोलन संक्रमण होण्याची कारणं

शरीरासाठी घातक ठरणारे प्रदुषित पदार्थ,  दुषित पाण्याचे सेवन, स्वच्छता न ठेवणं यांमुळे कोलन संक्रमण होऊ शकतं. हे संक्रमण झाल्यानंतर ताप येणं, पोटात जंत होणं, डायरिया, मळमळ अशी सामान्य लक्षणं दिसतात. याशिवाय झपाट्यानं वजन कमी होणं, मोठ्या आतड्यांच्या पेशी मृत होणं ज्यामुळे अल्सर होतो, अशी गंभीर लक्षणंही हळूहळू दिसू लागतात. ( हे पण वाचा-CoronaVirus News: हवेतील अल्ट्रावॉयलेट रेजमुळे नष्ट होऊ शकतो कोरोना, तज्ञांचा खुलासा)

कोणाला असतो जास्त धोका

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रीवेंशन यांनी दिलेल्या माहितीनुसार इन्फ्लेमेटरी बॉवेल डिजीजने पिडीत असलेल्या रुग्णांना हे संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. कारण यात इम्यून सिस्टीम डिफेक्टिव्ह असते. यात इम्यून सिस्टिम शरीराला सकारात्मक रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळे कोलनमध्ये सूज येते. हळूहळू ही सूज वाढत जाते. अनेकदा अनुवांशिकतेने सुद्धा या आजाराचं संक्रमण होतं. जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला इन्फ्लेमेटरी बॉवेल डिजीज असेल तर तुम्हाला सुद्धा कोलन संक्रमण होण्याची शक्यता आहे. ( हे पण वाचा-CoronaVirus News: कोरोनापासून बचावासाठी १० मिनिटं ऊन अंगावर घेणं गरजेचं, तज्ञांचा दावा)

Web Title: Who is at high risk of colon infection why irfan khan died know the reason myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.