Coronavirus : कोरोना व्हायरसच्या नव्या 'सुपरस्प्रेडर' स्ट्रेनबाबत WHO चं काय म्हणणं आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 04:36 PM2020-12-22T16:36:14+5:302020-12-22T16:37:25+5:30
WHO च्या आपातकालीन स्थितीचे प्रमुख माइक रेयान हे एका ऑनलाइन ब्रीफिंगमध्ये म्हणाले की, या मुद्द्यावर पारदर्शकात असणं फार गरजेचं आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना ५० देशांत बंदी केली आहे. आता यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले की, हा व्हायरसच्या विकासाचा एक भाग आहे. त्यामुळे नव्या सुपरस्प्रेडर स्ट्रेनला घाबरण्याची गरज नाहीये.
WHO च्या आपातकालीन स्थितीचे प्रमुख माइक रेयान हे एका ऑनलाइन ब्रीफिंगमध्ये म्हणाले की, या मुद्द्यावर पारदर्शकात असणं फार गरजेचं आहे. हे जसं आहे तसं जनतेला सांगणं गरजेचं आहे. हेही महत्वाचं आहे की, हा व्हायरसच्या विकासाचा एक सामान्य भाग आहे. आम्ही या व्हायरसला बारकाईने ट्रॅक करत आहोत. WHOच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसला नष्ट करण्यात आलेली वॅक्सीन या नव्या स्ट्रेनला नष्ट करण्यात सक्षम आहे. हे निश्चित करण्यासाठी आम्ही तपास करत आहोत.
WHO ने कोरोना व्हायरसचा हा नवा स्ट्रेन घातक नसल्याचं सांगितलं. त्यांनी ब्रिटनच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, आमच्याकडे कोणताही पुरावा नाही की, नवं व्हेरिएंट कोरोना व्हायरसच्या सध्याच्या स्ट्रेनच्या तुलनेत लोकांना अधिक आजारी करत आहे किंवा अधिक घातक आहे. पण हा सहजपणे पसरू शकतो.
ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यावरू माइक रेयान म्हणाले की, या प्रवासा रोख लावणारे देश सावधानतेने काम करत आहेत. हा एक विवेकपूर्ण निर्णय आहे. पण हे सर्वांनाच माहीत आहे की, कोरोना व्हायरसमध्ये झालेलं हे परिवर्तन सामान्य प्रक्रिया आहे.
WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, आम्ही अनेक परिवर्तन बघितले आहेत. हे वर्तमानात वापरलेल्या कोणत्याही चिकित्सीय, ड्रग्स किंवा लसीकरणासाठी व्हायरसच्या संवेदनशीलतेवर कोणताही प्रभाव टाकत नाही. अशात तो लवकरही नष्ट होऊ शकतो. WHO ने सांगितले की, पुढील काही दिवसात किंवा आठवड्यात चित्र स्पष्ट होईल.