तोंडाच्या दुर्गंधीला जबाबदार कोण? काय कराल उपाय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 11:51 AM2023-06-22T11:51:08+5:302023-06-22T11:51:30+5:30
दातांची निगा राखण्याकरिता नियमितपणे दोन वेळा ब्रश करणे तसेच जेवल्यानंतर तोंडात व्यवस्थित चूळ भरणे, जेणेकरून तोंडात अन्नाचे कण अडकून राहणार नाहीत.
काही व्यक्तींच्या तोंडातून सतत दुर्गंधी येत असते. त्या व्यक्तींना मौखिक आजाराच्या समस्या असतात. मात्र, तोंडात कोणती वेदना होत नाही म्हणून या व्यक्ती दंतरोग तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करून घेत नाही. या दुर्गंधीचा स्वतःला त्रास होत नसला तरी आजूबाजूच्या लोकांना याचा नक्कीच त्रास होत असतो. अनेकवेळा ते त्या व्यक्तीला ज्याची लवकर जाणीव होत नाही. मात्र अनेक मौखिक आजारांमुळे ही दुर्गंधी येत असल्याने ज्यावेळी त्या व्यक्तीला माहिती मिळते. त्यावेळी त्यांनी तत्काळ दंतरोग तज्ज्ञांकडून सल्ला घेतला पाहिजे.
काय उपाय कराल?
दातांची निगा राखण्याकरिता नियमितपणे दोन वेळा ब्रश करणे तसेच जेवल्यानंतर तोंडात व्यवस्थित चूळ भरणे, जेणेकरून तोंडात अन्नाचे कण अडकून राहणार नाहीत.
तसेच तोंडाच्या काही समस्या असतील तर तत्काळ दंतरोग तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा. मौखिक आरोग्याची वेळच्या वेळी तपासणी करून घ्यावी.
तसेच मधुमेह असेल तर संबंधित डॉक्टरांकडून मधुमेहावर तत्काळ उपचार करून घ्यावेत.
दातातून दुर्गंधी येणे ही प्राथमिक समस्या आहे. यासाठी दातांची योग्य निगा राखणे हा उपाय आहे. दाताच्या काही समस्या असतील तर त्याच्यावर दंतरोग तज्ज्ञांकडून उपाय करून घेणे केव्हाही गरजेचे असते. अनेकवेळा समस्या बळावल्यानंतर नागरिक दंतरोग तज्ज्ञांकडे जातात. दाताच्या समस्यांवर काही प्रमाणात औषध उपचार असले तरी कीड लागणे, हिरड्याचे आजार यावर उपचार करणे गरजेचे असते. दाताच्या आरोग्याचा हृदयरोगाशी संबंध जोडण्यात आला आहे. त्यामुळे नियमितपणे मौखिक आरोग्याची तपासणी करत राहणे हे गरजेचे आहे.
- डॉ. मानसिंग पवार, माजी अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई