'या' १० आजारांमुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू, कोरोनापेक्षाही भयंकर, WHO चा धक्कादायक रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 04:00 PM2024-08-09T16:00:24+5:302024-08-09T16:06:43+5:30
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये धक्कादायक तथ्य समोर आली आहेत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये धक्कादायक तथ्य समोर आली आहेत. रिपोर्टनुसार, २०२१ मध्ये जगभरातील मृत्यूंपैकी ५७% मृत्यू हे दहा आजारांमुळे झाले. यातील सर्वात मोठे कारण म्हणजे इस्केमिक हार्ट डिजीज.
जगभरातील एकूण मृत्यूंपैकी १३ टक्के मृत्यू त्यामुळे झाले आहेत. २००० पासून या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २७ लाखांनी वाढ झाली असून २०२१ मध्ये या आजारामुळे ९१ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर कोविडमुळे आठ लाख मृत्यू झाला आहे. सोप्या भाषेत, हार्ट अटॅक किंवा इस्केमिक हार्ट डिजीज कोरोनापेक्षा जास्त लोकांचा बळी घेत आहेत.
10 सर्वात प्राणघातक आजार
इस्केमिक हार्ट डिजीज
कोरोना व्हायरस
स्ट्रोक
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिजीज
लंग कॅन्सर
अल्झायमर
मधुमेह
किडनी डिजीज
टीबी
इस्केमिक हार्ट डिजीज म्हणजे काय?
इस्केमिक हार्ट डिजीजमध्ये, रक्त प्रवाहाच्या कमतरतेमुळे हृदय कमकुवत होतं. हे सहसा वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा परिणाम आहे. नसांमध्ये प्लाक जमा झाल्यामुळे ब्ल़ड सर्क्युलेशन नीट होत नाही. याचा त्रास झालेल्या व्यक्तीला छातीत दुखण्यापासून ते हार्ट अटॅकपर्यंत लक्षणं दिसू शकतात. त्याच्या उपचारात औषधे, अँजिओप्लास्टी, सर्जरी आणि जीवनशैलीत आवश्यक बदल यांचा समावेश होतो.
हृदय मजबूत ठेवण्याचा मार्ग
हृदय मजबूत होण्यासाठी आहारासोबतच व्यायामही खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला कधीही हृदयासंबंधित आजारांना बळी पडायचं नसेल तर दररोज १० ते १५ मिनिटं फिजिकल एक्टिव्हिटी करा.