सावधान! तुमची एक आवड तुम्हाला बनवू शकते कायमचं बहिरं; कोट्यवधी लोकांना मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 03:40 PM2024-08-08T15:40:35+5:302024-08-08T15:51:16+5:30

बहुतेकजण गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन किंवा इअरफोन वापरतात, जे खरंतर खूप धोकादायक आहे. त्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने कानांना इजा होण्याबरोबरच ऐकण्याची क्षमताही कमी होते.

who report risk of deafness due to using headphones at high volume know prevention | सावधान! तुमची एक आवड तुम्हाला बनवू शकते कायमचं बहिरं; कोट्यवधी लोकांना मोठा धोका

सावधान! तुमची एक आवड तुम्हाला बनवू शकते कायमचं बहिरं; कोट्यवधी लोकांना मोठा धोका

आपल्यापैकी बहुतेकजण गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन किंवा इअरफोन वापरतात, जे खरंतर खूप धोकादायक आहे. त्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने कानांना इजा होण्याबरोबरच ऐकण्याची क्षमताही कमी होते. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक हेडफोन, इअरफोन आणि इअरबडवर खूप अवलंबून आहेत. गाडी चालवताना असो किंवा घरात काम करत असताना, लोक जास्त वेळ कानात इअरफोन ठेवतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. भविष्यात तुमची ही आवड तुम्हाला बहिरं करू शकते. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे. डब्ल्यूएचओच्या मेक लिसनिंग सेफ सेफ गाइडलाइन्समध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, २०५० पर्यंत जगातील १०० कोटींहून अधिक तरुण बहिरे होऊ शकतात. त्यांचे वय १२ ते ३५ वर्षे असेल. यासाठी हेडफोन आणि इअरफोन जबाबदार आहेत.

हेडफोन-इअरफोन धोकादायक का?

मेक लिसनिंग सेफ गाइडलाइन्समध्ये असं म्हटलं आहे की, सध्या १२ ते ३५ वर्षे वयोगटातील सुमारे ५० कोटी लोक विविध कारणांमुळे बहिरेपणाच्या विळख्यात आहेत. यापैकी २५% इयरफोन्स, इअरबड्स, हेडफोन्सवर खूप मोठ्या आवाजात सतत काहीतरी ऐकत असतात. तर सुमारे ५०% लोक मोठ्या आवाजात संगीत, क्लब, डिस्कोथेक, सिनेमा, फिटनेस क्लास, बार किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहतात. याचा अर्थ, मोठ्या आवाजात संगीत ऐकण्याची आवड किंवा इअरफोनचा अतिवापर यामुळे एखाद्याला बहिरेपण येऊ शकते.

हेडफोनचा किती आवाज सुरक्षित?

तज्ज्ञांच्या मते, पर्सनल डिव्हाईसमध्ये व्हॉल्यूम लेव्हल ७५ डेसिबल ते १३५ डेसिबल पर्यंत असते. युजर्सनी या उपकरणांचा आवाज फक्त ७५ db ते १०५ db दरम्यान ठेवावा. त्याचा वापर देखील मर्यादित असावा. तज्ञांच्या मते, यापेक्षा जास्त आवाज कानाच्या सेन्सरी सेल्सना हानी पोहोचवतो.

डॉक्टरांच्या मते, हेडफोन-इअरफोनसारख्या उपकरणांच्या वापरामुळे येणारा बहिरेपणा कधीही बरा होऊ शकत नाही. खरं तर, मोठ्या आवाजाच्या सतत आणि दीर्घकाळ गाणी ऐकल्यास हाय फ्रिक्वेन्सीची नर्व डॅमेज होऊ शकते, जे रिव्हर्सिबल करता येत नाही. त्याच्यावर उपचार करणं शक्य नाही. हे बरं होत नाही. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशा उपकरणाचा काळजीपूर्वक वापर करा.
 

Web Title: who report risk of deafness due to using headphones at high volume know prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.