सावधान! 'या' पदार्थाच्या सेवनाबाबत WHO चा इशारा, दरवर्षी होणाऱ्या मृत्युचा आकडा वाचून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 10:30 AM2021-05-07T10:30:17+5:302021-05-07T10:34:29+5:30

'मिठाचं सेवन कमी करण्यासाठी आणि लोकांना चांगला आहाराचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार गेला पाहिजे'.

WHO says excess amount of salt intake causes 30 lakh deaths every year | सावधान! 'या' पदार्थाच्या सेवनाबाबत WHO चा इशारा, दरवर्षी होणाऱ्या मृत्युचा आकडा वाचून हैराण व्हाल

सावधान! 'या' पदार्थाच्या सेवनाबाबत WHO चा इशारा, दरवर्षी होणाऱ्या मृत्युचा आकडा वाचून हैराण व्हाल

Next

खाद्यपदार्थांमध्ये मिठाचा जास्त वापर हृदय रोग (Heart Disease) आणि स्ट्रोकचं कारण बनू शकतो. यामुळे लोकांना हृदयरोग आणि स्ट्रोकच्या समस्या अधिक प्रमाणात होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) बुधवारी खाण्यातील सोडिअम कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

एका रिपोर्टनुसार, जगभरात अंदाजे ११ मिलियन मृत्यू दरवर्षी खराब आहार म्हणजे खराब डाएटमुळे होतात. यातील ३ मिलियन म्हणजे ३० लाख अशा केसेस आहेत जे त्यांच्या डाएटमध्ये सोडिअम जास्त प्रमाणात सेवन करत होते. 
WHO ने सांगितले की, अनेक श्रीमंत देशात आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लोक निर्मिती खाद्य साहित्य म्हणजे मॅन्यूफॅक्चर्ड फूडचा वापर करतात. जसे की, ब्रेड, सेरिअल, प्रोसेस्ड मांस आणि चीजसारखे डेअरी प्रॉडक्ट्स. यात जास्त प्रमाणात सोडिअमचा वापर केला जातो. (हे पण वाचा : Covid-19 second wave: हार्ट अ‍ॅटॅकमुळे का होतोय कोरोना बाधितांचा मृत्यू? जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार)

काय म्हणाली WHO?

सोडिअम क्लोराइड हे मिठाचं रासयनिक नाव आहे आणि सोडिअम एक खनिज आहे. जे शरीरातील पाण्याचं प्रमाण नियंत्रित करतं. सोडिअमचंच्या सेवनाबाबत WHO चे डायरेक्टर जनलर टेड्रोस एडनॉम घेब्येयियस म्हणाले की, 'मिठाचं सेवन कमी करण्यासाठी आणि लोकांना चांगला आहाराचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार गेला पाहिजे'.

ते पुढे म्हणाले की, 'खाद्य आणि पेय उद्योगाला प्रोसेस्ड फूडमध्ये सोडिअमचं प्रमाण कमी करावं लागेल. खाण्या-पिण्याच्या ६४ पदार्थांबाबत WHO ने एक नवा बेंचमार्क तयार केला आहे. याच्या माध्यमातून १९४ सदस्य देशातील अधिकाऱ्यांना जागरूक केलं जाईल. जेणेकरून ते खाद्य-पेय पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांना मॉनिटर करू शकतील.

किती खावं मीठ?

उदाहरण द्यायचं तर प्रति १०० ग्रॅम बटाट्याच्या चिप्समध्ये ५०० मिलि ग्रॅम सोडिअम असावं. बेंचमार्कनुसार, पाईज आणि पेस्ट्रीजमध्ये १२० मिली ग्रॅम आणि मीटमध्ये ३६० मिली ग्रॅम सोडिअम असावं. WHO ने सांगितले की, 'खाण्यात प्रमाणापेक्षा जास्त सोडिअम घेतल्याने ब्लड प्रेशर वाढतं. याने हृदयरोगाचा धोकाही वाढतो.

कोणते आजार होतात?

WHO ने सांगितले की, जगभरात सर्वात जास्त मृत्यू हे हृदयरोगांमुळे होतात. जगात यामुळे ३२ टक्के मृत्यू याच कारणाने होतात. जास्त सोडिअमचं सेवन केल्याने लठ्ठपणा, किडनीशी संबंधित आजार आणि गॅस्ट्रिक कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होतात. WHO ने सांगितले की, लोकांनी दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी सोडिअमचं सेवन करावं. 
 

Read in English

Web Title: WHO says excess amount of salt intake causes 30 lakh deaths every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.