डायबिटीस, हार्ट अटॅकसारख्या आजारांना दूर ठेवायचंय? WHO ने सांगितल्या 4 खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 11:41 AM2022-08-25T11:41:04+5:302022-08-25T11:41:26+5:30

Health TIps : WHO ने एका डेटाद्वारे सांगितलं की, जगात 70 टक्के लोकांना हृदयरोग, स्ट्रोक, कॅन्सर, डायबिटीस, फुप्फुसांची समस्या होते. मरणाऱ्यांमध्ये 16 मिलियनपेक्षा जास्त लोकांचं वय 70 पेक्षा कमी आहे.

WHO shared healthy tips to reduce diabetes blood sugar control and heart disease | डायबिटीस, हार्ट अटॅकसारख्या आजारांना दूर ठेवायचंय? WHO ने सांगितल्या 4 खास टिप्स

डायबिटीस, हार्ट अटॅकसारख्या आजारांना दूर ठेवायचंय? WHO ने सांगितल्या 4 खास टिप्स

googlenewsNext

Health TIps : डायबिटीस एक असा आजार आहे ज्यात व्यक्तीला आपल्या खाण्या-पिण्याची पूर्ण काळजी घ्यावी लागते. तसं केलं नाही तर डायबिटीसमुळे पुढे हार्ट किंवा किडनीची समस्या होऊ शकते. अनेकदा डायबिटीस इतका जास्त वाढतो की, याने शरीराच्या इतर अवयवांमध्ये समस्या होते. याच हेल्थ समस्यांबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने नुकतंच एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी चार हेल्थ टिप्स सांगितल्या आहेत. ज्या डायबिटीस, हृदय, स्ट्रोक आणि कॅन्सरच्या समस्यांपासून लढण्यास मदत करतात. WHO ने एका डेटाद्वारे सांगितलं की, जगात 70 टक्के लोकांना हृदयरोग, स्ट्रोक, कॅन्सर, डायबिटीस, फुप्फुसांची समस्या होते. मरणाऱ्यांमध्ये 16 मिलियनपेक्षा जास्त लोकांचं वय 70 पेक्षा कमी आहे.

WHO ने सांगितलं की, या आजारांची वाढण्याची मुख्य कारणे आहेत तंबाखूचं जास्त सेवन, फिजिकल अॅक्टिविटी कमी असणे, मद्यसेवन जास्त करणे आणि जास्त फास्ट फूड खाणे. अशात या आजारांचा धोका कमी करण्यासाठी काही टिप्स आहेत.

1) मिठाचं सेवन कमी प्रमाणात करा

WHO ने सांगितलं की, एका दिवसात मिठाचं साधारण 5 ग्रॅम किंवा एक चमच्यापेक्षा जास्त सेवन करू नये. मिठाऐवजी ताज्या हिरव्या पालेभाज्या आणि ताज्या मसाल्यांचा वापर करावा. शक्यतो मीठ असलेले सॉस, सोया सॉस यांचं सेवन कमी करा.
नंतर WHO ने साखरेबाबत सांगितलं की, एका दिवसात साखरेचा 50 ग्रॅम किंवा 12 चमच्यांपेक्षा जास्त वापर करू नये आणि प्रयत्न हाच करा की, 50 ते 25 ग्रॅम इतकाच वापर करा. तसेच 2 वर्षाच्या मुलांच्या जेवणात साखर किंवा मिठाचा वापर करू नये.

2) ट्रान्स सॅच्युरेटेड फॅटचा वापर 

प्रयत्न हाच करा की, कमी फॅट असलेल्या दुधापासून तयार पदार्थांचा वापर करा जसे की, पांढरं चिकन किंवा मासे. बीकन आणि सोसेजसारख्या मीटचा वापर कमी करा. तळलेल्या पदार्थांचं सेवन कमी करा.

3) बॅलन्स डाएट 

रोज अशा पदार्थांचं सेवन करा ज्यात होलग्रेन ब्राउन राइस आणि पीठापासून तयार पदार्थ असतील. हिरव्या पालेभाज्या आणि फळांचंही सेवन करायला हवं. जेवणात मीट, दूध, फिश आणि अंड्यांचा समावेश करा.

4) काय प्यावं आणि काय पिऊ नये

जास्त प्रमाणात शुगर असलेले कोल्ड ड्रिंक, सोडा, कॉफी, मसालेदार ड्रिंकचं सेवन अजिबात करू नये. मद्यसेवनही करू नये आणि जास्तीत जास्त पाणी प्यावं.

Web Title: WHO shared healthy tips to reduce diabetes blood sugar control and heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.