सकाळी नाश्ता न करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे गंभीर परिणाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:03 IST2024-12-10T12:01:27+5:302024-12-10T12:03:48+5:30
Breakfast Skipping Side Effects : तुम्हाला सुद्धा नाश्ता न करण्याची सवय असेल तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सकाळी नाश्ता न करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे गंभीर परिणाम!
Breakfast Skipping Side Effects : ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता आपला दिवसातील सगळ्यात महत्वाचा आहार असतो. त्यामुळेच नाश्त्यात नेहमीच हेल्दी पदार्थ खाण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. मात्र, काही लोक सकाळच्या नाश्त्यात इतकं महत्व देत नाहीत. पण त्यांना हे माहीत नसतं की, सकाळचा नाश्ता स्कीप करणं शरीरासाठी महागात पडू शकतं. तुम्हाला सुद्धा नाश्ता न करण्याची सवय असेल तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
अमेरिकन रोग नियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार, २०२५ ते २०१८ पर्यंत २० वर्षापेक्षा अधिक वयोगटाच्या १५ टक्के लोकांनी नियमित रूपाने नाश्ता करणं सोडलं. सकाळची धावपळ, उपवास किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न यामुळे हे चलन वाढलं. तर काही लोकांना दिवसाची सुरूवात जेवणाने करायची नसते.
नाश्ता न करण्याचे नुकसान
'जर्नल ऑफ न्यूरो रेस्टोरेटोलॉजी' मध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, सकाळचा नाश्ता न करणं भरपूर नकारात्मक प्रभाव टाकू शकतं. याने शरीरात तणाव निर्माण होतो, ज्यामुळे कार्टिसोल हार्मोन्स जास्त रिलीज होतात. याने पुढे जाऊन पोटावरील चरबी वाढते. नाश्ता न केल्याने लो ब्लड शुगरची समस्याही होते. कारण मेंदुला सकाळी खाण्याची गरज असते, जेव्हा ते मिळत नाही तेव्हा मेंदू स्पष्टपणे विचार करू शकत नाही. ग्लूकोजला मेंदुचं प्राथमिक ईंधन मानलं जातं.
एका रिसर्चनुसार, नाश्ता करणं सोडल्याने मेंदुच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव बघायला मिळतो. अभ्यासकांनी रिसर्चमध्ये सहभागी लोकांचे दोन ग्रुप केले. जेणेकरून नाश्ता सोडणाऱ्यांची तुलना नाश्ता करणाऱ्यांसोबत करता यावी.
यात सहभागी लोकांचा एमआरआय करण्यात आला. ज्यात नाश्ता न करणाऱ्या लोकांचा मेंदू आकुंचन पावलेला दिसला. जो डिमेंशियाच्या लक्षणाचा भाग आहे. त्याशिवाय ब्लड टेस्ट करण्यात आली. त्यात काही न्यूरो डिजनरेशन बायोमार्करचा स्तर त्या लोकांमध्ये अधिक होता जे नाश्ता स्कीप करत नव्हते. अशात डिमेंशियापासून बचाव करण्यासाठी नाश्ता आवश्यक आहे.
सकाळचा नाश्ता स्कीप केल्याने व्यक्ती डिमेंशियाचा शिकार होऊ शकतो. डिमेंशिया मेंदुसंबंधी एक आजार आहे. यात मेंदुच्या कोशिकांचं नुकसान होतं आणि समजण्या-विचार करण्याची क्षमता कमी होते. डिमेंशियामध्ये स्मरणशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता आणि शिकण्याची क्षमता प्रभावीत होते.