अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी गरम पाणी पिणं ठरू शकतं घातक, जाणून घ्या कुणी टाळावं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 10:31 AM2024-11-04T10:31:32+5:302024-11-04T10:32:11+5:30
Side Effect Of Lukewarm Water : काही लोकांसाठी कोमट पाणी पिणं नुकसानकारक ठरतं. अशात आज आम्ही तेच सांगणार आहोत की, कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी कोमट पाणी पिऊ नये.
Side Effect Of Lukewarm Water : बरेच लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पितात. सकाळी कोमट पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. मात्र, कोमट पाणी पिणं हे सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरतं असं नाही. काही लोकांसाठी कोमट पाणी पिणं नुकसानकारक ठरतं. अशात आज आम्ही तेच सांगणार आहोत की, कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी कोमट पाणी पिऊ नये.
कोणत्या लोकांनी पिऊ नये कोमट पाणी?
१) सर्दी-पडस्याचे रूग्ण
सर्दी-पडसा झालेल्या रूग्णांनी गरम पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण गरम पाण्याच्या सेवनाने घशातील सूज आणि इरिटेशन वाढतं. ज्यामुळे स्थिती आणखी वाढू शकते. त्याऐवजी हलकं कोमट पाणी प्यावं. ज्यामुळे घशाला आराम मिळेल.
२) लहान मुले
लहान मुलांनी मोठ्यांसारखं गरम पाणी पिऊ नये. कारण लहान मुलांचं डायजेस्टिव सिस्टम सेन्सिटिव्ह असतं आणि गरम पाणी प्यायल्याने पोटाचं आणि आतड्यांचं नुकसान होऊ शकतं. लहान मुलांनी नॉर्मल पाणी प्यावं. गरम पाणी प्यायले तर पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
३) लिव्हरचे रूग्ण
लिव्हरची काही समस्या असलेल्या लोकांनी गरम पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण याने लिव्हरवर जास्त दबाव पडतो. अशा रूग्णांनी थंड पाण्याचं सेवन करावं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती काळजी घ्यावी. लिव्हर एक संवेदनशील अवयव आहे. जर यात काही समस्या झाली तर शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांवर प्रभाव पडतो.
४) दातांची समस्या असेल तर...
ज्या लोकांच्या दातांना झिणझिण्या येतात किंवा दातांसंबंधी काही समस्या असतील तर त्यांनी गरम आणि थंड गोष्टींपासून दूर रहावं. अशा लोकांनी केवळ नॉर्मल पाणीच प्यावे.