दही खाताना अजिबात करू नये 'या' चुका, जाणून घ्या कुणी खाऊ नये दही!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 10:24 AM2024-06-07T10:24:29+5:302024-06-07T10:26:59+5:30
Side effects Of Curd :अनेकांना हे माहीत नसतं की, दह्याचं जास्त सेवन केल्यानेही नुकसान होतं. दह्यामुळे कधी नुकसान होऊ शकतं हेच आज आम्ही सांगणार आहोत
Side effects Of Curd : उन्हाळ्यात लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दह्याचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. कुणी दह्याची लस्सी पितात तर कुणी तीन-चार वाटी दही खातात. दह्याचे शरीराला अनेक फायदेही मिळतात. अनेक एक्सपर्ट नियमितपणे दही खाण्याचा सल्लाही देतात. दह्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन B12 आणि कॅल्शिअम भरपूर असतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, दह्याचं जास्त सेवन केल्यानेही नुकसान होतं. दह्यामुळे कधी नुकसान होऊ शकतं हेच आज आम्ही सांगणार आहोत
दही खाताना टाळायच्या गोष्टी
- ज्या लोकांना कफ आणि कंजक्शनची समस्या आहे त्यांनी चुकूनही दह्याचं सेवन करू नये. उन्हाळ्यात दह्यामुळे कफाची समस्या आणखी वाढू शकते.
- जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर फार जास्त दही खाणं टाळलं पाहिजे. दही हे फॅट असलेल्या दुधापासून बनवलं जातं. त्यामुळे जर जास्त दही खाल्लं तर वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं. तसेच याने हाडांची डेसिंटी कमी होते.
- जर तुमचं पचन तंत्र कमजोर असेल तर दही खाणं टाळलं पाहिजे. कारण पचवण्याला वेळ लागतो. अशात ज्या लोकांचं डायजेस्टीव सिस्टीम कमजोर आहे त्यांनी आठवड्यातून केवळ 2 ते 3 दिवसच दही खावं.
- दही नेहमीच दिवसा खावं. रात्री दही खाणं नुकसानकारक ठरू शकतं. आयुर्वेदानुसार दह्यामुळे म्यूकस वाढतो. यामुळे तुम्हाला श्वासासंबंधी समस्या होऊ शकतात.
- दही खाताना या गोष्टीची काळजी घ्या की, दही ताजं खावं. दही जास्त दिवसाचं असेल तर ते आंबट लागतं. यामुळे गॅसची समस्या वाढते. घरी बनवलेलं दही खाणं कधीही चांगलं.
- दह्यात साखर टाकून खाल्ल्याने तहान भागते. पण डायबिटीसच्या रूग्णांसाठी दह्यात साखर टाकून खाणं नुकसानकारक ठरू शकतं. असात डायबिटीसचे रूग्ण दह्यात साखर टाकण्याऐवजी छासचं सेवन करू शकता.
- दही कधीही गरम करून खाऊ नये. दही गरम केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात.