कोणत्या समस्या असल्यावर अळशीच्या बियांचं करू नये सेवन?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 11:22 AM2024-08-17T11:22:01+5:302024-08-17T11:37:21+5:30

Side Effects of Flaxseeds: आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी अळशीच्या बियांचं सेवन करू नये.

Who should not eat flaxseed even by mistake it may cause huge loss | कोणत्या समस्या असल्यावर अळशीच्या बियांचं करू नये सेवन?

कोणत्या समस्या असल्यावर अळशीच्या बियांचं करू नये सेवन?

Side Effects of Flaxseeds: आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात अळशीच्या बियांचा समावेश करण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. अळशीच्या बियांनी भलेही तुम्हाला वजन कमी करण्यास आणि डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळत असेल तरीही काही लोकांसाठी अशी बियांचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी अळशीच्या बियांचं सेवन करू नये.

बद्धकोष्ठतेची समस्या

अनेक समस्यांवर रामबाण उपाय असूनही अळशीच्या बीया बद्धकोष्ठतेच्या समस्येत फार नुकसानकारक आहे. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या नेहमीच होत असेल तर अळशीच्या बियांमुळे आतड्यांमध्ये अडथळा होऊ शकतो.

गर्भावस्थेत खाऊ नये

अळशी बीया या गरम असतात. त्यामुळे गर्भावस्था किंवा प्रेग्नेन्सी दरम्यान या बियांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. एक्सपर्ट सांगतात की, याने आई आणि बाळ दोघांनाही नुकसान होऊ शकतं. याच्या जास्त सेवनामुळे यातील एस्ट्रोजन गुण हार्मोनल असंतुलनचं कारण बनतात. 

औषधांचा साईड इफेक्ट्स

जर तुम्ही डायबिटीस किंवा रक्त पातळ करण्याचं औषध घेत असाल तर अळशीच्या बियांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण यांनी औषधं प्रभावित होऊ शकतात. अशात गरजेचं आहे की, या बियांचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावं.

एलर्जीची समस्या

अळशीच्या बियांचं सेवन केल्याने अनेक लोकांना एलर्जीची तक्रारही होऊ शकते. जर तुम्हाला लो ब्लड शुगरची समस्या असेल तर या बियांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण याने पोटदुखी आणि घाबरल्यासारखं वाटणं अशी समस्या होऊ शकते.

लूज मोशन असल्यावर....

जर तुम्हाला नेहमीच लूज मोशनची म्हणजे जुलाब लागण्याची समस्या होत असेल तर अळशीच्या बियांचं सेवन टाळलं पाहिजे. याने लूज मोशनची समस्या अधिक वाढू शकते. तुम्हाला डायरियाही होऊ शकतो. 

Web Title: Who should not eat flaxseed even by mistake it may cause huge loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.