'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये चिकू, जाणून घ्या होणारे साइड इफेक्ट्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:21 IST2025-02-04T12:19:15+5:302025-02-04T13:21:51+5:30

Health Tips : प्रमाणापेक्षा जास्त चिकू खाल्ल्यास आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी चिकू खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Who should not eat sapota or chiku? Know its side effects | 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये चिकू, जाणून घ्या होणारे साइड इफेक्ट्स!

'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये चिकू, जाणून घ्या होणारे साइड इफेक्ट्स!

Health Tips : बाजारात सध्या गोड चिकू भरपूर प्रमाणात मिळत आहेत. चिकूमध्ये अनेक औषधी गुण असतात, त्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे. भरपूर प्रमाणात फायबर असलेल्या चिकूनं पोट आणि पचन तंत्र चांगलं राहतं. पण जास्त प्रमाणात चिकू खाल्ल्यास काही नुकसानही होऊ शकतात. चिकूमध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण आढळतात, जे बद्धकोष्ठता, सूज, जॉईंट्सचं दुखणं कमी करतात. पण प्रमाणापेक्षा जास्त चिकू खाल्ल्यास आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी चिकू खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कुणी खाऊ नये चिकू?

डायबिटीस - शुगर असलेल्या लोकांनी चिकू खाऊ नये. चिकूमध्ये जास्त प्रमाणात नॅचरल शुगर असते. त्यामुळे डॉक्टर डायबिटीसमध्ये चिकू न खाण्याचा सल्ला देतात. चिकू खाल्ले तर शुगर लेव्हल वाढू शकते. त्यामुळे डायबिटीस असलेल्यांनी चिकू खाणं टाळलं पाहिजे.

एलर्जी - जर तुम्हाला कोणत्या प्रकारची एलर्जी असेल तर तुम्ही चिकू अजिबात खाऊ नये. कारण चिकू खाल्ल्यास एलर्जीची समस्या वाढू शकते. कारण यात टॅनिन आणि लेटेक्स नावाचं केमिकल असतं, जे शरीरात एलर्जी ट्रिगर करतं. त्यामुळे एलर्जी असलेल्यांनी चिकू खाणं टाळलं पाहिजे.

पचन तंत्रावर दबाव - चिकू पोट आणि पचनासाठी चांगलं फळ असतं. यात फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे गट हेल्थ चांगली राहते. पण जास्त प्रमाणात चिकू खाल्ल्यास पचन तंत्रावर अधिक दबाव पडू शकतो. ज्यामुळे पचनासंबंधी समस्या वाढू शकते. ज्यांचं पचन तंत्र आधीच बिघडलेलं असेल त्यांनी चिकू खाणं टाळलं पाहिजे.

वजन वाढतं - चिकू खाल्ल्यानं अनेकदा लठ्ठपणाही वाढतो. जास्त चिकू खाल्ल्यास वेट गेन होण्यास मदत मिळते. खासकरून जे लोक चिकूचा शेक बनवून पितात त्यांचं वजन वाढण्याचा धोका अधिक असतो. 

तोंडाची चव बदलते - अनेकदा चिकू खाल्ल्यानंतर तोंडाची चव बदलल्यासारखं जाणवतं. खासकरून जर तुम्ही कच्च चिकू खाल्लं तर तोंडात कडवटपणा जाणवू शकतो. चिकूमधील लेटेक्स आणि टॅनिननं तोंडाची चव बदलते.

Web Title: Who should not eat sapota or chiku? Know its side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.