या लोकांनी चुकूनही खाऊ नये हळद, आरोग्यासाठी पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 02:54 PM2022-10-17T14:54:21+5:302022-10-17T14:54:46+5:30
These People Should Not Eat Turmeric: तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हळद सगळ्यांसाठीच चांगली नसते. चला जाणून घेऊ हळदीचं जास्त सेवन कुणासाठी नुकसानकारक ठरू शकते.
These People Should Not Eat Turmeric: हळद एक असा मसाला आहे जो आपल्या किचनमध्ये सगळ्यात जास्त वापरला जातो. याने जेवणाची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात. हळदीशिवाय भाजी बेरंग दिसते. हळदीच्या औषधी गुणांमुळे हेल्थ एक्सपर्ट हळद नियमीत खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हळद सगळ्यांसाठीच चांगली नसते. चला जाणून घेऊ हळदीचं जास्त सेवन कुणासाठी नुकसानकारक ठरू शकते.
डायबिटीसचे रूग्ण
ज्या लोकांना डायबिटीसची समस्या असते त्यांना त्यांचं रक्त पातळ ठेवण्यासाठी अनेक औषधांचं सेवन करावं लागतं. सोबतच त्यांना ग्लूकोजचं प्रमाण नियंत्रित ठेवावं लागतं. जर डायबिटीसचे रूग्ण जास्त प्रमाणात हळदीचं सेवन केलं तर त्यांच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी होईल. जे शरीरासाठी अजिबात चांगलं ठरणार नाही.
काविळ झालेले रूग्ण
ज्या लोकांना काविळ रोग म्हणजे जॉन्डिस आहे त्यांनी हळद जेवढी टाळता येईल तेवढी टाळावी. तरिही तुम्हाला हळद खायची असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसं केलं नाही तर आरोग्य बिघडू शकतं.
किडनी स्टोनचे रूग्ण
किडनी स्टोन ही एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे खूप त्रास होतो. या रूग्णांना खूप वेदनेचा सामना करावा लागतो. अशात हळदीचं सेवन कमी करावं. नाही तर समस्या जास्त वाढू शकते.
ब्लीडिंगचे रूग्ण
ज्या लोकांना नाकातून आणि शरीरातून ब्लीडिंगची समस्या असते त्यांनी हळदीचं सेवन कमी करायला हवं. असं केलं नाही तर रक्तस्त्राव वाढू शकतो. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता होऊ शकते. पुढे जाऊन याने कमजोरी येऊ शकते.