WHO ने सांगितली शिल्लक राहिलेलं अन्न पुन्हा गरम करण्याची योग्य पद्धत, नष्ट होतील बॅक्टेरिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 09:13 AM2024-06-18T09:13:31+5:302024-06-18T09:14:23+5:30
Food Reheat : WHO नुसार, एकदा शिजवलेले पदार्थ तुम्ही लगेच खात नसाल तर ते पुन्हा गरम करणं चांगलं असतं. पण असं करणं तेव्हाच योग्य असतं तेव्हा ते योग्य पद्धतीने गरम केलं जातं.
Food Reheat : बरेचजण रात्री शिल्लक राहिलेले पदार्थ सकाळी गरम करून खातात. तर काही लोक शिल्लक राहिलेले पदार्थ गरम न करताच खातात. अनेकांचं असं मत असतं की, एकदा शिजवलेले पदार्थ पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यात विष तयार होतं.
WHO नुसार, एकदा शिजवलेले पदार्थ तुम्ही लगेच खात नसाल तर ते पुन्हा गरम करणं चांगलं असतं. पण असं करणं तेव्हाच योग्य असतं तेव्हा ते योग्य पद्धतीने गरम केलं जातं. त्यामुळे शिल्लक राहिलेले पदार्थ पुन्हा गरम करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. तेव्हाच अन्न हेल्दी आणि सुरक्षित राहतं.
अन्न पुन्हा गरम करण्याचे नुकसान
जर तुम्ही अन्न एकापेक्षा जास्त वेळ गरम करत असाल तर ते बरोबरच पचत नाही. खासकरून प्रोटीन असलेले पदार्थ जसे की, अंडी, चिकन पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रोटीनची संरचना बदलते. ज्याला प्रोटीन डीनेचुरेशन म्हणतात. तसेच अन्न पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्वही कमी होतात.
भात आणि पास्तासारखे पदार्थ तयार केल्यावर त्यात काही वेळातच बॅक्टेरिया तयार होतात. हे पदार्थ पुन्हा गरम केल्यावरही त्यातील बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत आणि फूड बोर्न डिजीजचा धोका वाढतो.
जर तुम्ही बटाटे किंवा ब्रेड पासून तयार कोणतेही पदार्थ पुन्हा गरम करत असाल तर त्यात एक्रीमालाइड तयार होतं. हे तत्व तुम्हाला कॅन्सरचा शिकार बनवू शकतं.
WHO ने सांगितली योग्य पद्धत
WHO नुसार कोणतेही पदार्थ कमीत कमी ७० डिग्री सेल्सियसवर पुन्हा गरम करू शकता. असं केल्याने त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. पण ही प्रक्रिया केवळ एकदाच करावी. कारण पुन्हा पुन्हा गरम केल्याने पदार्थाची क्लालिटी खराब होते.
लिक्वीड टाका
पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यातील काही भाग कोरडा होतो. अशात गरम करतेवेळी त्यात थोडं पाणी किंवा सॉस टाका. याने पदार्थाची टेस्ट कायम राहते.
थोडं थोडं गरम करा
पदार्थ पूर्ण एकत्र गरम करणं टाळलं पाहिजे. जर पदार्थ एकत्रच गरम करत असाल तर त्यांची टेस्ट बिघडण्याचा धोका असतो. सोबतच त्यांची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे तुम्हाला जेवढं खायचं आहे तेवढचं गरम करा.
राहिलेल्या पदार्थापासून वेगळी डिश
जे अन्न रात्री शिल्लक राहतं ते पुन्हा गरम करण्यासाठी एक वेगळी पद्धत वापरू शकता. शिल्लक राहिलेल्या अन्नापासून वेगळी डिश बनवा. याने टेस्टही वेगळी येईल.