सावधान! आता 'या' ६ प्रकारे होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; WHOची धोक्याची सुचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 03:42 PM2020-07-19T15:42:48+5:302020-07-19T15:53:09+5:30
CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरस कोणकोणत्या माध्यमातून पसरू शकतो याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले की, सहा प्रकारे कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं.
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, कोरोनाची माहामारी अजून रौद्र रुप धारण करू शकते. या व्हायरसच्या प्रसाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस कोणकोणत्या माध्यमातून पसरू शकतो याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले की, सहा प्रकारे कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं.
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे व्यक्ती कोरोना संक्रमित होऊ शकते.
संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकण्यातून लाळेच्या ड्रॉपलेट्समधून व्हायरस हवेत पसरल्यास संक्रमण होऊ शकतं.
संक्रमित व्यक्तीच्या रक्तामुळे संक्रमण पसरण्याचा धोका असू शकतो.
आईला कोरोनाची लागण झाली असल्यास बाळालाही कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं.
व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यामुळे लागण होण्याची शक्यता असते.
संक्रमित व्यक्तीने उघड्यावर मलविसर्जन केल्यास व्हायरसचा प्रसार इतर व्यक्तींपर्यंत होण्याची शक्यता असते.
जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याची सुचना दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहेनम गेब्रयेसस यांनी मागच्या आठवड्यात कोविड 19 च्या माहामारीबाबत धोक्याची सुचना दिली होती. त्यांनी सांगितले की, जगभरात दिवसेंदिवस कोरोनाची माहामारी अधिकच धोकादायक होत चालली आहे. आता कोरोनासोबतच जगावं लागणार आहे. अनेकदेश या माहामारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
एकिकडे ट्रंप जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख चीफ टेड्रोस यांच्यावर कोरोनाशी निगडीत माहिती लपल्याचा आरोप लावत होते. आता टेड्रोस त्यांच्याकडून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत ट्रंप यांचे नाव घेतले जात आहे. अशा स्थितीत ट्रंप त्यांना दोषी का ठरवलं जातंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यावर्षी अमेरिकेत निवडणूका आहेत. या निवडणूनका लक्षात घेता ट्रंप यांना लोकांचं घरात बंद राहणं आणि बंदिस्थ जीव जगणं स्विकार नव्हते. पण अमेरिकेतील लोक कोरोना काळात जेव्हा सामान्य जीवन जगत होते. तेव्हा ही माहामारी जास्त पसरत गेली.
आता परत अमेरिकेत कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रशियाच्या काही भागात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. टेड्रोस यांनी सांगितले की जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अमेरिकेसोबतच ब्राजीलच्या राष्ट्रपतीनींही कोरोना संक्रमणापासून बचावासाठी मास्क आणि लॉकडाऊनचा विरोध केला. आता ब्राझिलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्य़ेत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने ब्राझिलच्या राष्ट्रपतींना दोषी मानले आहे.
कोरोनापासून बचावासाठी WHO ने मास्कचा आणि सॅनिटायजरचा वापर करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. देशात नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तरीसुद्धा देशात अनेक ठिकाणी सोशस डिस्टेंसिंगचं पालन केलेलं दिसत नाही. त्यामुळे संक्रमण वाढत आहे. WHO कडून सॅनिटायजचा वापर वारंवार साबणाने हात धुणं आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन हे मुख्य तीन उपाय सांगितले आहेत.
ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?
Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?