किडनीसाठी कशी नुकसानकारक आहे दारू? कारण वाचाल तर पिणं सोडाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 01:18 PM2023-10-04T13:18:07+5:302023-10-04T13:18:16+5:30
Why Alcohol Is Harmful For Kidney: शरीरातील विषारी पदार्थ किडनीद्वारे बाहेर काढले जातात. अशात चला जाणून घेऊ दारूमुळे किडनी कशी खराब होते.
Why Alcohol Is Harmful For Kidney: दारू आपल्या आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. दारूमुळे शरीराचं फार नुकसान होतं. हार्ट, लिव्हर, ब्रेनसहीत अनेक अवयव प्रभावित होतात. पण दारूमुळे किडनीला सगळ्यात जास्त नुकसान पोहोचतं. किडनी आपल्यासाठी फार महत्वाचा अवयव आहे. शरीरातील विषारी पदार्थ किडनीद्वारे बाहेर काढले जातात. अशात चला जाणून घेऊ दारूमुळे किडनी कशी खराब होते.
किडनीच्या कामावर प्रभाव
दारू प्यायल्याने किडनीमध्ये ब्लड फ्लो वाढतो. ज्यामुळे किडनीवर जास्त प्रेशर पडतं. अशात किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते. एकदा जर किडनी खराब झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.
किडनीवर सूज
जे लोक आपल्या दारू पिण्याच्या सवयीवर कंट्रोल करू शकत नाहीत, त्यांच्या किडनीवर सूज येते. यानंतर किडनीमध्ये वेदना होऊ लागतात ज्या असह्य असतात.
किडनी डॅमेजचा धोका
जर इतक्या त्रासानंतरही तुम्ही दारू पिणं बंद करत नसाल तर किडनी डॅमेज होण्याचा धोका अधिक असतो. ज्या लोकांच्या दोन्ही किडनी खराब होतात त्यांना आयुष्यभर डायलिसिसचा आधार घ्यावा लागतो.
किडनीची काळजी
किडनी आपले महत्वाचे अवयव आहेत. अशात त्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. सगळ्यात आधी तर दारू बंद केली पाहिजे. त्यानंतर दिवसातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायला हवं. त्याशिवाय लिंबू पाणी, नारळाचं पाणी प्यायला हवं.