तुम्हाला स्वप्न का आणि कशी पडतात? जाणून घ्या रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 08:52 PM2021-06-06T20:52:27+5:302021-06-06T20:54:34+5:30

आपल्या सर्वांनाच झोप लागल्यानंतर स्वप्न पडतात. ही स्वप्न चांगली किंवा वाईटही असू शकतात. रात्री पाहिलेली स्वप्न अनेकदा आपल्याला सकाळी लक्षात राहत नाहीत. तुमच्यासोबत देखील असं घडत का?

Why and how do you dream? Learn the secret | तुम्हाला स्वप्न का आणि कशी पडतात? जाणून घ्या रहस्य

तुम्हाला स्वप्न का आणि कशी पडतात? जाणून घ्या रहस्य

Next

आपल्या सर्वांनाच झोप लागल्यानंतर स्वप्न पडतात. ही स्वप्न चांगली किंवा वाईटही असू शकतात. रात्री पाहिलेली स्वप्न अनेकदा आपल्याला सकाळी लक्षात राहत नाहीत. तुमच्यासोबत देखील असं घडत का? असेल तर आपल्याला ही स्वप्न का आठवत नाहीत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. जाणून घेऊया की आपल्याला स्वप्न का पडतात आणि आपण ती का विसरतो.

आपल्याला स्वप्न का पडतात?
आपल्या झोपेचे अनेक टप्पे असतात. ज्यामध्ये एक रॅपिड आय मूव्हमेंट नावाचा टप्पा असतो. या टप्प्यामध्ये तुम्ही गाढ झोपेत असता. याच कालावधीत स्वप्न पडतात. स्वप्नांच्या संबंधात अनेक शास्त्रीय संशोधन झालेली आहेत.
एका थियरीनुसार झोपेत असताना देखील आपला मेंदु सक्रिय असतो. मात्र त्यावेळी त्यातील लॉजिकल सेंटर ऐवजी इमोशनल सेंटर अधिक कार्यरत असतात. त्यामुळे जीवनातील ज्या भावनात्मक विचारांवर आणि परिस्थितीवर आपण झोपेत नसताना लक्ष देत नाही त्या विचारांशी आणि परिस्थितीशी संबंधित स्वप्न आपल्याला पडतात.

स्वप्नांना लक्षात कसं ठेवता येतं?
जेव्हा आपण स्वप्न बघत असतो त्यावेळी लक्षात ठेवणारं ब्रेन केमिकल नॉरपेनेफ्रिन आणि ब्रेन इलेक्ट्रिक अॅक्टीव्हीटी सर्वात कमी सक्रिय असतात. त्यामुळे स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता फार कमी असते. जे स्वप्न बघून आपण त्वरित झोपेतून उठतो ती स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते.
स्वप्न लक्षात ठेवण्यासाठी झोपताना या गोष्टीचा विचार करा की तुम्हाला रात्री पडणारं स्वप्न लक्षात ठेवायचं आहे. जर झोपण्यापूर्वी तुमचा असा विचार असेल तर सकाळी उठल्यावर स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर बेडवरून न उठता स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्हाला तुमचे स्वप्न आठवेल.

Web Title: Why and how do you dream? Learn the secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.