चिंता वाढली! कोरोना एँटीबॉडी चाचण्यांवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित, जाणून घ्या रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 03:37 PM2020-06-08T15:37:24+5:302020-06-08T15:39:22+5:30
एखादया व्यक्तीमध्ये व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल पण टेस्ट निगेटिव्ह आली तर त्या व्यक्तीचे फिरणं, इतरांशी संपर्क साधणं, बोलणं घातक ठरू शकतं. त्यामुळे व्हायरसच्या प्रसाराचा धोका वाढू शकतो.
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी एँटीबॉडी टेस्ट केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एँटीबॉडी टेस्टबाबत ते साशंक आहेत.WHO ने एप्रिल महिन्यात दिलेल्या माहितीनुसार एँटीबॉडी टेस्टवर विसंबून राहिल्याने व्हायरस पसरण्याचा धोका वाढू शकतो.
अमेरिकन मेडिकल असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार एँटीबॉडी टेस्टचा वापर रोगप्रतिराकशक्तीची क्षमता ओळखण्यासाठी केला जातो. अमेरिकेतील संस्था सीडीसीतील तज्ज्ञांच्यामते एँटीबॉडी टेस्ट करून कारखाने, शाळा, ऑफिसेस मध्ये लोकांना काम करण्यासाठी परवागनी दिली जात आहे. पण एंटीबॉडी टेस्ट तुलनेने कमी विश्वसनीय आहे.
जास्तीत जास्त एँटीबॉडी टेस्टचे रिजल्ट चुकीचे येत आहेत. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार टेस्टमध्ये अनेकदा कोविड एँटीबॉडीजचे निगेटिव्ह रिजल्ट येत आहेत. पण एखादया व्यक्तीमध्ये व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल पण टेस्ट निगेटिव्ह आली तर त्या व्यक्तीचे फिरणं, इतरांशी संपर्क साधणं, बोलणं घातक ठरू शकतं. त्यामुळे व्हायरसच्या प्रसाराचा धोका वाढू शकतो.
टेस्टिंग किटचा दर्जा व्यवस्थित नसल्याचे असे रिजल्ट येत आहेत असं म्हणता येणार नाही, कारण उच्च गुणवत्ता असेलल्या कंपनीचे टेस्टिंग किट सुद्धा चुकीचे रिजल्ट देत आहे. भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्ये टेस्टिंग किटच्या गुणवत्तेबाबत सवाल उपस्थित करण्यात आला आहे. उच्च दर्जाच्या टेस्टिंग किट सुद्धा चुकीचे रिजल्ट देत आहेत.
अमेरिकेतील हेल्थ डिपार्टमेंटमधील वापरात असलेले किट चे सुद्धा ८० टक्के चुकीचे रिजल्ट आले आहेत. याचं कारण टायमिंग असू शकतं असं तज्ज्ञांनी सांगितले आहे. व्हायरसचा प्रसार जितका जास्त होईल तेव्हढचं याबाबत नमुने मिळवून देत असेलल्या टेस्ट अचूक असतील. जगभरातील लोकसंख्येचा विचार केला असता कमी लोक कोरोनाबाधित असल्यामुळे टेस्टचे रिजल्ट चुकीचे येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
युद्ध जिंकणार! कोरोनासोबत जगताना भारतीयांना विषाणूंपासून वाचवणार 'या' ६ गोष्टी
Unlock 1: जीम ८०%, शाळा ७०% अन् सलून ६०%; ‘या’ ३५ ठिकाणी कोरोनाचा किती धोका? जाणून घ्या