रक्ताचा रंग लाल असतो मग नसा निळ्या किंवा हिरव्या रंगांच्या का दिसतात? वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:27 PM2022-08-17T12:27:05+5:302022-08-17T12:27:59+5:30
Blood and Vains Colour : जेव्हा हीमोग्लोबिन फुप्फुसातून ऑक्सीजन घेतं, तेव्हा रक्ताचा रंग चमकदार चेरी रेड होतो. यानंतर हे रक्त धमण्यांमध्ये आणि त्याद्वारे शरीरातील टिश्यूपर्यंत पोहोचतं.
Blood and Vains Colour : रक्ताचा रंग लाल असतो, मग आपल्या शरीरातील नसांचा निळा किंवा जांभळा रंग का असतो? सामान्यपणे एक धारणा बनली आहे की, ऑक्सिजनयुक्त रक्त लाल असतं, तर विना ऑक्सिजन असलेलं रक्त हे निळं असतं. पण हे सत्य नाहीये. रक्ताचा रंग केवळ लाल असतो. लाल रक्तपेशींमध्ये प्रोटीन असतं ज्यात ऑक्सीजन असतं. त्याला हीमोग्लोबिन म्हणतात. याच्या प्रत्येक अणुमध्ये आयर्नचे चार परमाणु असतात, जे लाल प्रकाश दर्शवतात. तेच आपल्या रक्ताला लाल रंग देतात.
जेव्हा हीमोग्लोबिन फुप्फुसातून ऑक्सीजन घेतं, तेव्हा रक्ताचा रंग चमकदार चेरी रेड होतो. यानंतर हे रक्त धमण्यांमध्ये आणि त्याद्वारे शरीरातील टिश्यूपर्यंत पोहोचतं. वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीचे हीमॅटोलॉजीचे प्रोफोसर डॉ. क्लेबर फेरट्रिन यांच्यानुसार, शरीरातील सर्व टिश्यूपर्यंत रक्त पोहोचवल्यानंतर जेव्हा रक्त फुप्फुसांपर्यंत परत येतं, तेव्हा नसांमध्ये वाहणारं विना ऑक्सीजनचं रत् गर्द लाल रंगाचं होतं.
याचा अर्थ हा आहे की, रक्त वेगवेगळ्या लाल रंगाचं असू शकतं. पण असं कधीच होत नाही की, मनुष्याचं रक्त निळं झालं. निळ्या दिसणाऱ्या नसांमधून रक्त काढलं तर ते लालच दिसेल.
डॉ. क्लेबर फेरट्रिन म्हणाले की, निळ्या किंवा हिरव्या नसा दिसणं हे केवळ एक इल्यूजन आहे. कारण नसांच्या त्वचेचा थर पातळ थराखाली असतो. आपण जो रंग बघतो, तो त्या वेवलेंथवर आधारित असतो ज्याला आपला रेटिना समजलं जातं. आणि त्वचेचे वेगवेगळे थर वेवलेंथला वेगवेगळ्या प्रकारे दाखवतात.
गर्द रंगाच्या त्वचेखाली, नसा नेहमीच हिरव्या दिसतात. तर हलक्या रंगाच्या त्वचेखाली नसा निळ्या किंवा जांबळ्या रंगाच्या दिसतात. हे होतं कारण प्रकाशाच्या हिरव्या आणि निळ्या वेवलेंथ, लाल वेवलेंथपेक्षा छोटी असते. निळ्या रंगाच्या तुलनेत लाल प्रकाश मनुष्याच्या टिश्यूंना भेदण्यात प्रभावी आहे. दरम्यान, हेही माहीत असायलं हवं की, रक्ताचा रंग निळाही असतो. पण तो मनुष्यांमध्ये नाहीतर खेकडे, झिंगे, ऑक्टोपस आणि कोळींमध्ये असतो.