तारुण्यात का पडते टक्कल?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 04:18 PM2016-11-25T16:18:16+5:302016-11-25T16:18:16+5:30

सध्या ऐन तारुण्यात सुमारे ३० टक्के पुरुषांना केस गळतीच्या समस्येने ग्रासले असून, वेगवेगळे उपचार करुनही फारसा फायदा होत नाही. वेळीच काळजी न घेणे यासारख्या अनेक कारणांनी ही समस्या भेडसावत आहे

Why is the boy's bald bald? | तारुण्यात का पडते टक्कल?

तारुण्यात का पडते टक्कल?

Next
्या ऐन तारुण्यात सुमारे ३० टक्के पुरुषांना केस गळतीच्या समस्येने ग्रासले असून, वेगवेगळे उपचार करुनही फारसा फायदा होत नाही. वेळीच काळजी न घेणे यासारख्या अनेक कारणांनी ही समस्या भेडसावत आहे. पाहुया की काय आहेत तरुणपणातच टक्कल पडण्याची कारणे. 
बदलते राहणीमान व त्यामुळे आलेला ताणतणाव हे एक मुख्य कारण आहे. बऱ्याचदा पुरुष आपल्या मनातील दु:ख इतरांना सांगत नाहीत. साहजिकच तणाव निर्माण होऊन हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यामुळे केस गळतीला सुरुवात होते. 

बºयाच तरुणांना तंबाखू खाण्याची व धुम्रपान करण्याची सवय असते. हे देखील केस गळतीचे एक कारण आहे. जास्त प्रमाणात दारूचे सेवन केल्यामुळे शरीरातील टॉक्झिन्सचे प्रमाण वाढते तसेच लोह, झिंक व पाण्याची पातळी कमी होते यामुळे शरीरातील आॅक्सिजनची पातळी कमी होऊन केसांना हानी पोहोचते व केस गळू लागतात. शिवाय बरेचदा अनुवंशिक कारणांमुळे देखील पुरूषांचे केस गळतात. शरीरात डीटीएच हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळेदेखील पुरूषांचे केस गळतात. काहीवेळा हृदयविकार, थायरॉईड, डिप्रेशन यांसारख्या आजारावरील गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा केस गळू लागतात. आहारात लोह, प्रथिने, कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्यास केस गळू लागतात. हेअर कलर्स, शॅम्पू, कंडिशनर यांमध्ये असलेल्या केमिकल्सच्या साईड इफेक्टमुळे केस गळतात. फंगल इंफेक्शन तसेच डोक्यातील कोंड्यामुळे पुरूषांचे केस जाण्याची शक्यता असते.

Web Title: Why is the boy's bald bald?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.