'या' 4 चुकांमुळे कमी होण्याऐवजी वाढू लागतं कोलेस्ट्रॉल, मग कंट्रोल करणं होतं अवघड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 12:25 PM2023-05-19T12:25:05+5:302023-05-19T12:25:35+5:30
Reason of High Cholesterol Level : याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढवणं गरजेचं असतं. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळए बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढत जातं.
Reason of High Cholesterol Level : बरेच लोक शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. पण आपल्याच काही चुकांमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्याऐवजी पुन्हा वाढतं. कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढण्याची अनेक कारणे आहेत. पण आपल्यालाही आपल्या सवयींना बंद करणं गरजेचं आहे. एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल किती धोकादायक असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढवणं गरजेचं असतं. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळए बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढत जातं.
1) डायटरी फॅट पूर्णपणे बंद करणे
कोलेस्ट्रॉल मॅनेज करण्यामागे पूर्ण उद्देश एलडीएल कमी करणं आणि एचडीएल वाढवणं आहे. आहारातून डायटरी फॅट कमी करणं त्या लोकांकडून केली जाणारी एक फार कॉमन चूक आहे, ज्यांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. याऐवजी तुम्हाला ट्रांस फॅटचं सेवन कमी करण्याची गरज आहे. ऑलिव ऑइल, अक्रोड आणि बदाममध्ये फॅटचं नियमित सेवन केलं पाहिजे. याने गुड कोलेस्ट्रॉल वाढतं.
2) नियमितपणे औषधे न घेणं
औषधं कोलेस्ट्रॉल मॅनेज करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सल्ला दिला जातो की, नियमितपणे आपली ब्लड टेस्ट करा आणि याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत.
3) अनियमित डायट प्लान
काही दिवसातच एका डायट प्लानवरून दुसऱ्या डाएट प्लानवर स्वीच करणं शरीरासाठी अनहेल्दी ठरू शकतं. कोलेस्ट्रॉल मॅनेज करण्यासाठी तुम्हाला एक स्थिर डाएटची गरज असते. ज्यात हेल्दी आणि पौष्टिक आहार असेल. कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कडधान्य, हेल्दी फॅट, मासे, फळं, नट आणि भाज्यांचं सेवन करा.
4) धूम्रपान आणि मद्यसेवन न सोडणं
तुम्ही हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करू शकत नाही कारण तुम्ही सतत धूम्रपान आणि मद्यसेवन करता. केवळ डाएट आणि औषधांच्या माध्यमातून कोलेस्ट्रॉल कंट्रोल जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला धूम्रपान आणि मद्यसेवन बंद करावं लागेल.