व्हायरल गेलं पण खोकला पाठ सोडेना, टेस्ट नॉर्मल तरीही होतोय त्रास; डॉक्टरांनी सांगितलं 'ते' कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 03:24 PM2023-03-30T15:24:08+5:302023-03-30T15:29:37+5:30

व्यक्ती बरी झाल्यानंतरही हा खोकला अनेक आठवडे कायम राहतो.

why cough persists for long after patient recovered from viral attack know what experts says | व्हायरल गेलं पण खोकला पाठ सोडेना, टेस्ट नॉर्मल तरीही होतोय त्रास; डॉक्टरांनी सांगितलं 'ते' कारण

व्हायरल गेलं पण खोकला पाठ सोडेना, टेस्ट नॉर्मल तरीही होतोय त्रास; डॉक्टरांनी सांगितलं 'ते' कारण

googlenewsNext

सध्या लोकांना व्हायरल इन्फेक्शन, कोरोना व्हायरस किंवा फ्लूमधून बरे होऊनही पूर्णपणे निरोगी वाटत नाहीत. कारण कोरडा खोकला आहे. व्यक्ती बरी झाल्यानंतरही हा खोकला अनेक आठवडे कायम राहतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खोकला बराच काळ सुरू राहिल्यास यासाठी डॉक्टरांना दाखवावे लागेल. यामध्ये किंचितही निष्काळजीपणा दाखवू नका, असे सांगण्यात आले आहे.

डॉक्टरांनी सांगितले की असे रुग्ण त्यांच्याकडे येत आहेत ज्यांना सौम्य फ्लूसह खोकलाच्या तक्रारी आहेत. हा खोकला 4 आठवडे किंवा 1 महिन्यापासून कायम आहे. डॉक्टरांनी पुढे सांगितले की यापैकी बहुतेक रुग्णांच्या फुफ्फुस, रक्त आणि एक्स-रे चाचण्या सर्व काही सामान्य आहे. मग या खोकल्याचे कारण काय?. हा खोकला हवेतील प्रदूषण कण, गॅस्ट्रिक एसिडिटी, एलर्जी आणि दमा यामुळे देखील होऊ शकतो असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. 

फोर्टिस हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथील वरिष्ठ सल्लागार डॉ. अभिजीत सिंह यांनी सांगितले की, ज्यांना आधीपासून कोणताही आजार नाही ते 1 ते 2 आठवड्यांत बरे होत आहेत. परंतु काही प्रकरणांमध्ये खोकला बराच काळ टिकतो. पाहिल्यावर कळते की खोकल्याची लक्षणे काहीशी दम्यासारखी असतात. आणि तपासणीत असे आढळून आले की अशा रुग्णांच्या कुटुंबात दम्याची तक्रार आहे. ज्यामुळे ते आनुवंशिक कारणांमुळे या रुग्णांमध्येही आले आहे. पीएसआरआय संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले डॉ. जी.सी. खिलनानी यांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीच्या थुंकीत रक्त दिसले तर सावध राहण्याची गरज आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीला बराच वेळ ताप येत असेल आणि संध्याकाळी थकवा येतो, रात्री घाम येत असेल तर ही धोक्याची घंटा आहे.

पुढील सूचना देताना जी.सी.खिलनानी म्हणाले की, अशा परिस्थितीत जर तुम्ही स्वतः औषधे घेत असाल तर त्यासाठी आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताप किंवा कोरड्या खोकल्याच्या तक्रारींवर लोक अनेकदा अँटिबायोटिक्स, कॉस्टिकोस्टेरॉईड्स आणि इनहेलर घेतात. डॉ. विकास मौर्य यांनी सांगितले की, पूर्वी ही सर्व लक्षणे कोरोनाची मानली जात होती. परंतु इन्फ्लूएंझा H3N2, स्वाइन फ्लू किंवा इतर रोगांसारख्या श्वसनाच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. बऱ्याच काळापासून येणारा खोकला त्रास देत आहे.

'असा' करा बचाव

- तुम्ही फ्लू, इन्फ्लूएंझा किंवा कोणत्याही आजाराने त्रस्त असाल, तर तुम्ही अँटीबायोटिकचा गैरवापर करू नये.

- जेव्हाही तुम्ही बाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाल तेव्हा मास्क घाला. तसेच त्रासदायक धुरापासून दूर राहा.

- शक्य असल्यास, इनडोअर एअर फिल्टर किंवा प्युरिफायरचा वापर करा.

- आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा.

- हे आजार बरे करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही औषधे घेऊ नका. 

- तुमचा खोकला दीर्घकाळ राहिल्यास, निष्काळजीपणा न करता, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: why cough persists for long after patient recovered from viral attack know what experts says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य