कान का गरम होतात? जाणून घ्या काय करणे योग्य किंवा अयोग्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 02:33 PM2021-06-29T14:33:19+5:302021-06-29T14:33:52+5:30
बरेचदा आपले कान गरम होतात. कान गरम झाल्याने आपल्याला नेमके काय झाले आहे याची चिंता आपल्याला वाटू शकते. काहीवेळा कान गरम होण्यासोबतच लालही होतात. अशावेळी काय करावे?
बरेचदा आपले कान गरम होतात. कान गरम झाल्याने आपल्याला नेमके काय झाले आहे याची चिंता आपल्याला वाटू शकते. काहीवेळा कान गरम होण्यासोबतच लालही होतात. तसेच कानांना सुजही येते. याची अनेक कारण असू शकतात. पण घाबरण्याचं कारण नाही यावर उपायही आहेत. जाणून घेऊया कान का गरम होतात आणि त्यावरचे उपाय काय?
कसे समजते कान गरम झाले आहेत?
कानात काही इन्फेक्शन झाले आहे तर कान गरम होऊ शकतात. तसेच कानात दुखणे, स्त्राव होणे, ऐकायला न येणे अशी लक्षणे दिसू लागतात. जर उन्हामुळे कान गरम झाले असतील तर कानाची त्वचा लालसर दिसू लागते.
कान का गरम होतात?
- उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे कान गरम होऊ शकतात.
- गरम किंवा थंड हवेमुळेही कान गरम होऊ शकतात.
- तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मानसिक स्थितीमुळेही कान गरम होऊ शकतात. जर तुम्हाला भरपूर राग आला असेल किंवा एन्झाईटी वाटत असेल तर त्यामुळेही कान गरम होऊ शकतात.
- व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळेही कान गरम होऊ शकतात.
- हार्मोन्समध्ये बदल झाल्याने कान गरम होऊ शकतात.
- मेनॉपॉज किंवा केमोथेरपीच्या दरम्यानही तुमचे कान गरम होऊ शकतात.
उपाय काय?
- तुमचे कान गरम होत असतील तर साफसफाईवर लक्ष द्या. कानात जमलेल्या मळामुळे इअर इन्फेक्शन होते. त्यामुळे कान गरम झाल्यासारखे वाटतात.
- कानाचा साफसफाईसाठी एक दोन महिन्यांनंतर डॉक्टरकडे जा
- कान दुखत असतील तर कानात तेल घालु नका डॉक्टरांनी दिलेले इअरड्रॉप टाका.
- कानाला खाज येत असेल तर कान साफ करण्यासाठी टोकदार वस्तूंचा वापर करू नका. यामुळे कानाच्या नसांना इजा होण्याची शक्यता असते.
- कान गरम होण्यापासून वाचण्यासाठी इन्फेक्शनमुक्त ठेवा. त्यामुळे विशेष काळजी घ्या की कान ओले राहणार नाहीत.
- जास्त वेळ गाणी एकू नका किंवा जास्त वेळ फोनवर बोलुही नका. बाथरुममध्ये असताना फोनचा वापर करू नका यामुळे तुमच्या कानांना इन्फेक्शन होईल.