अलर्ट! फुफ्फुसांकडे आता पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देण्याची गरज का आहे?; कोविडनंतर 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 05:55 PM2021-10-30T17:55:50+5:302021-10-30T18:08:18+5:30

Corona Virus And Lungs : सध्या चालू असलेल्या कोविड १९ महामारीमुळे संपूर्ण जगाला जाणीव झाली आहे की एखाद्या व्यक्तीच्या सामान्य कार्यासाठी फुफ्फुसे किती महत्वाचे आहेत.

Why do lungs need more attention now than ever before? doctor advice in corona virus | अलर्ट! फुफ्फुसांकडे आता पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देण्याची गरज का आहे?; कोविडनंतर 'अशी' घ्या काळजी

अलर्ट! फुफ्फुसांकडे आता पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देण्याची गरज का आहे?; कोविडनंतर 'अशी' घ्या काळजी

googlenewsNext

डॉ. हरीष चाफळे

मानवाच्या जगण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व अवयवांमध्ये फुफ्फुस हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की, शरीराच्या सर्व टिश्यूजना योग्यरित्या कार्य करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि हा ऑक्सिजन फुफ्फुसांचे कार्यरत युनिट एलव्हिओलसद्वारे आपल्या रक्ताभिसरणात प्रवेश करतो. सध्या चालू असलेल्या कोविड १९ महामारीमुळे संपूर्ण जगाला जाणीव झाली आहे की एखाद्या व्यक्तीच्या सामान्य कार्यासाठी फुफ्फुसे किती महत्वाचे आहेत.

फुफ्फुस हा एक नाजूक अवयव आहे जो सतत बाह्य वातावरण आणि आपल्या सभोवतालात हवेत असणाऱ्या जीवांशी संपर्कात येतो. हे सर्व ज्ञान असूनही आपण आपल्या फुफ्फुसांप्रति बेपर्वा असतो. सामान्य तब्येत असताना आपण आपल्या श्वासोच्छवासाकडे फारसे लक्ष देत नाही. आपल्यामध्ये श्वासोच्छवासाच्या जीवनासाठी प्रवेशद्वार म्हणून फुफ्फुस असंख्य बाह्य घटकांशी संपर्कात येतो जसे की एलरजेन्स, प्रदूषक आणि सूक्ष्मजीव ज्यामुळे श्वसन संक्रमण, दमा आणि दीर्घकालीन अडथळा फुफ्फुसाचा आजार (COPD) आजार होतात. कोविड-१९ आजाराने फुफ्फुसांची काळजी घेण्याकडे होत असलेले दुर्लक्ष उघड केले आहे. एका अहवालानुसार, श्‍वसनाचे आजार हे जगात मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमुख कारण आहे आणि जगभरात सुमारे 4 दशलक्ष लोक दीर्घकालीन श्वसन रोग आणि फुफ्फुसाशी संबंधित इतर आजारांमुळे अकाली मरण पावतात. कोविड१९ च्या संसर्गामुळे अलीकडे ही संख्या वाढली आहे, जिथे फुफ्फुस हे प्रवेश स्थळ आणि प्रभावित होणारे प्रमुख अवयव आहे.

फुफ्फुसांची काळजी घेणे आवश्यक 

आपल्या शरीराच्या प्रत्येक टिश्यूजना ऑक्सिजन देण्यासाठी फुफ्फुस आपल्या हृदयासोबत काम करते. त्यामुळे ते एकत्र कार्डिओ-पल्मोनरी फंक्शनचा आधार  तयार करतात. म्हणूनच या दोन्ही अवयवांचे पुरेसे आणि इष्टतम कार्य अत्यंत महत्वाचे आहे. जर आपले हृदय पुरेसे कार्य करत असेल आणि फुफ्फुसे कोविड19 संसर्गासह त्याच्या कोणत्याही आजारामुळे चांगले कार्य करत नसेल तर संपूर्ण शरीराला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि शरीरात धोकादायक कार्बन-डाय-ऑक्साईड जमा झाल्यामुळे त्रास होईल. त्यामुळे निरोगी जीवनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला योग्य श्वसनाची काळजी घेण्याची आणि धूर, वायू प्रदूषक आणि सूक्ष्मजीवांच्या संपर्कात न येण्याची गरज आहे. म्हणून आपण आपले वातावरण स्वच्छ ठेवणे आणि आपल्या फुफ्फुसांची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण दररोज खोल श्वासोच्छवासाचा व्यायाम करून आपल्या फुफ्फुसाचे कार्य सुधारले पाहिजे, प्राणायाम त्यापैकी एक आहे. याशिवाय हाताने धरता येणारे इन्सेन्टिव्ह स्पायरोमीटर सारखी काही उपकरणे देखील आपले फुफ्फुस मजबूत करण्यास मदत करतात. अशाप्रकारे श्वासोच्छवासाची काळजी सुधारून, कार्डिओपल्मोनरी फंक्शन सुधारण्यास मदत होईल आणि आरोग्य व निरोगीपणाला प्रोत्साहन मिळेल.

आपल्या फुफ्फुसांची ही सर्व काळजी भारतातील श्वसन सेवा युनिट्स आणि थेरपिस्टच्या वाढत्या उपलब्धतेद्वारे सुधारली जाऊ शकते. आपल्या देशात, रेस्पिरेटरी थेरपिस्ट (RTs) विकसित झाले आहेत आणि रूग्णालयांमध्ये आणि विशेषतः क्रिटिकल केअर युनिट्समध्ये वाढले आहेत जेथे ते श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांच्या श्वसन कार्यास समर्थन आणि सुधारणा करण्यात व ऑपरेशन झालेल्या रुग्णांसाठी उपयोगी येतात. कोविड-19 महामारी  दरम्यान, RTs ने अतिदक्षता कर्मचार्‍यांसह व्हेंटिलेटर चालवणे सुरू ठेवले ज्याने अनेक कोविड-19 रूग्णांना जिवंत ठेवले आणि या व्यवसायाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. तथापि, प्रशिक्षित RTs आणि व्यापक मान्यता यांची कमतरता आहे. म्हणूनच भारतभरातील अनेक आयसीयूमध्ये RT ची वाढती आवश्यकता आहे.

चाचणी करून फुफ्फुसांची स्थिती अद्ययावत करणे 

आपले फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी तसेच नियमितपणे ठराविक चाचणी करून फुफ्फुसांची स्थिती अद्ययावत करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी मॉनिटरिंग टूल्सपैकी पल्स ऑक्सिमीटर हे सर्वात सहज आणि आता सहजपणे उपलब्ध असलेले उपकरण आहे ज्याला आता जगभरातील सर्व घरांमध्ये प्रवेश मिळाला आहे. पल्स ऑक्सीमीटर हे रक्तामध्ये किती ऑक्सिजन आहे याचे मोजमाप आहे जे अप्रत्यक्षपणे आपल्याला आपल्या फुफ्फुसांच्या स्थितीबद्दल कल्पना देते. पल्स ऑक्सिमीटर अशा लोकसांसाठी खूप उपयुक्त आहे ज्यांना ऑक्सिजन सॅच्युरेशन प्रभावित करणारे कंडिशन आहे. उदाहरणार्थ, झोपेचा तज्ज्ञ संशयित स्लीप एपनिया किंवा गंभीर घोरणाऱ्या व्यक्तीच्या रात्रभर ऑक्सिजन सॅच्युरेशनच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरची शिफारस करू शकतो. पल्स ऑक्सिमेट्री ऑक्सिजन थेरपी आणि व्हेंटिलेटर सारख्या श्वासोच्छवासाच्या हस्तक्षेपाच्या प्रभावीतेबद्दल फीडबॅक देखील प्रदान करू शकते. फुफ्फुसांच्या कार्यांचे नियमित निरीक्षण आणि श्वसन चिकित्सकांकडून नियमित तपासणी केल्याने आपली फुफ्फुसे निरोगी राहतील आणि त्यावर नेहमी लक्ष ही राहील. जेणेकरून आपण आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करणारे कोणतेही कंडिशन किंवा संक्रमणाचा सामना करण्यास तत्पर राहू.

 पुन्हा एकदा सध्याच्या कोविड१९ महामारीने आपले फुफ्फुस निरोगी ठेवण्याच्या गरजेकडे या पृथ्वीवरील प्रत्येक मानवाचे डोळे उघडले आहेत. त्यामुळे कोविड१९ तसेच ट्युबरक्युलॉसिस यांसारख्या धोकादायक संसर्गापासून दूर राहण्यासाठी आता निरोगी फुफ्फुसाच्या संकल्पनेकडे लक्ष वळवले गेले आहे.

(लेखक ग्लोबल हॉस्पिटल, परळ येथे पल्मोनोलॉजी आणि क्रिटिकल केअर विभागात सिनिअर कन्सल्टंट आहेत.)
 

Web Title: Why do lungs need more attention now than ever before? doctor advice in corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.