...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 02:42 PM2019-08-14T14:42:24+5:302019-08-14T14:43:15+5:30
डास चावल्याने अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु, अनेकदा डास चावल्यानंतर त्वचेवर खाज येते. आपल्या आजूबाजूला काही असे डासही असतात, जे चावल्याने अनेक गंभीर आजार असतात.
डास चावल्याने अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु, अनेकदा डास चावल्यानंतर त्वचेवर खाज येते. आपल्या आजूबाजूला काही असे डासही असतात, जे चावल्याने अनेक गंभीर आजार असतात. परंतु, सामान्य डास चावल्यानंतर त्वचेला खाज येते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? डास चावल्याने त्वचेला खाज का येत असावी? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डास चावल्यानंतर त्वचेला खाज येण्यामागील कारण...
डास चावल्यानंतर त्वचेला येणाऱ्या खाजेबाबत सांगण्याआधी आम्ही डासांबातच्या काही गोष्टी सांगणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का? सगळेच डास आपलं रक्त पित नाहीत. फक्त मादा डासचं रक्त शोषून घेते. नर मच्छर फक्त चावतात. मादा मच्छर अंडी देत असल्यामुळे रक्त शोषून घेतात. जगभरामध्ये डासांच्या जवळपास 3 हजार 500 प्रजाति आढळून येतात. परंतु, यापैकी जास्तीज जास्त प्रजाति माणसांना अजिबात त्रास देत नाहीत. हे डास फक्त फळं आणि झाडांच्या रसावर जिवतं राहतात.
आता जाणून घेऊया की, डास चावल्यानंतर त्वचेला खाज का येते त्याबाबत... डास चावल्यानंतर त्वचेवर छिद्र पडतं आणि रक्त वाहिनी प्रभावित होते. त्यांना रक्त शोषणं सोपं व्हावं यासाठी ते शरीरामध्ये एक लाळेप्रमाणे असणारं तत्व सोडतात. हे तत्व anticoagulant रूपात काम करतं आणि शरीरात प्रवेश केल्यानंतर डास चावलेल्या ठिकाणी त्वचेवर खाज येते. एवढचं नाहीतर त्वचा लालही होते. असं सांगितलं जातं की, डास चावल्यामुळे त्वचेवर जी खाज येते. त्यामागे डासांच्या लाळेमध्ये असलेलं तत्व कारणीभूत असतं.
जर डासांच्या आयुष्याबाबत बोलायचं झालं तर डास जास्त दिवस जीवंत राहू शकत नाही. तसेच मादा डास, नराच्या तुलनेत जास्त दिवस जीवंत राहते. जर नर डासांबाबत सांगायचे झाले तर ते 6 ते 8 आठवड्यांपर्यंतच जीवंत राहू शकतात. खरं तर मादा डास प्रत्येक तीन दिवसांनी अंडी देतात आणि मादा डास 2 महिन्यांपर्यंत जीवंत राहते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.