मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश का करतात लोक? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 03:05 PM2024-09-23T15:05:07+5:302024-09-23T15:05:43+5:30

मोहरीच्या तेलामध्ये हेल्दी फॅट्स, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं. जे शरीरासाठी फायदेशीर असतं. तसेच यात ओमेगा ३ आणि ६ फॅटी अ‍ॅसिडही असतं.

Why do people massage their foot with mustard oil? know its benefits | मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश का करतात लोक? जाणून घ्या कारण...

मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश का करतात लोक? जाणून घ्या कारण...

Rubbing Mustard Oil On Feet: भरपूर लोक जेवण बनवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करतात. असं मानलं जातं की, मोहरीचं तेल एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. इतकंच नाही तर या तेलामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. मोहरीच्या तेलामध्ये हेल्दी फॅट्स, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं. जे शरीरासाठी फायदेशीर असतं. तसेच यात ओमेगा ३ आणि ६ फॅटी अ‍ॅसिडही असतं.

तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण भरपूर लोक तळपायांवर मोहरीचं तेल लावतात. याने काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. या तेलाने त्वचा नॅचरल पद्धतीने मॉइश्चराईज होते. तळपायांना हे तेल लावून मालिश केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.  

मोहरीच्या तेलाने मालिश करण्याचे फायदे

मोहरीच्या तेलाला आयुर्वेदात आरोग्याच्या दृष्टीने फार महत्व आहे. याच्या सेवनासोबतच याने मालिश केल्याने मसल्सना आराम मिळतो. या तेलाने मालिश केल्याने शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं. रात्री तेलाने तळपायांनी मालिश केल्याने पायांना आराम मिळतो आणि मेंदुही रिलॅक्स होतो. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोपही येते.

महिलांसाठी फायदेशीर

ज्या महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटात वेदना होतात, त्यांनी रात्री झोपण्याआधी तळपायांवर मोहरीच्या तेलाने मालिश करावी. याने मासिक पाळीतील वेदना कमी होतात आणि मसल्सना आराम मिळतो. 

झोप चांगली लागते

ज्या लोकांना झोप न येण्याची म्हणजे इन्सोम्नियाची समस्या असते, त्यांच्यासाठी हे तेल खूप फायदेशीर ठरतं. या लोकांनी रात्री झोपण्याआधी कोमट तेलाने तळपायांची मालिश करावी. यामुळे मानसिक तणाव दूर होतो आणि रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. जे लोक तणाव किंवा चिंतेचे शिकार आहेत त्यांनी रोज या तेलाने तळपायांची मालिश करावी. 

Web Title: Why do people massage their foot with mustard oil? know its benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.