जोरात लघवी लागली असताना लोक का मारु लागतात उड्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 12:37 PM2018-12-12T12:37:39+5:302018-12-12T12:40:18+5:30
तुम्हीही अनेकदा याचा अनुभव घेतला असेल किंवा कुणाला पाहिलं असेल की, एखाद्याला जर बराचवेळ लघवी करण्याची संधी मिळाली नसेल तर तो व्यक्ती वेगवेगळे अंगविक्षेप करु लागतो.
तुम्हीही अनेकदा याचा अनुभव घेतला असेल किंवा कुणाला पाहिलं असेल की, एखाद्याला जर बराचवेळ लघवी करण्याची संधी मिळाली नसेल तर तो व्यक्ती वेगवेगळे अंगविक्षेप करु लागतो. मग एका पायावर कसातरी उभा राहून विचित्र गोष्टी करुन लघवी रोखून धरण्याचा प्रयत्न करतो. ही सवय केवळ लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्या व्यक्तींमध्येही बघायला मिळते. पण काय कधी तुम्ही विचार केलाय की, ही सवय लोकांमध्ये समान रुपाने का आहे? आणि बराच वेळ लघवी करायला न मिळाल्याने अनेकजण 'डान्स' का करु लागतात?
लघवी रोखणे कठीण
यूरिनेशन किंवा लघवी करणे ही शरीराची एक नैसर्गिक क्रिया आहे. या माध्यमातून किडनी शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकते. ही शरीराची महत्त्वपूर्ण क्रिया असल्याने यावर कुणीही फार काळ आवर घालू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीचं दिवसातून ६ ते ८ वेळा वॉशरुमला जाणं सामान्य आहे. जास्त पाणी पित असाल तर अर्थातच जास्त वेळ तुम्हाला लघवीला जावं लागेल.
कितीवेळा लघवी करावी यावर कंट्रोल नाही
एखाद्या व्यक्तीने कितीवेळा लघवीला जावे यावर कोणतंही कंट्रोल नाहीये. पण काही लोक मानतात की, ते या क्रियेला काही वेळासाठी रोखू शकतात. अशात जेव्हा बराचवेळ लघवीला न गेल्याने दबाव वाढतो, तेव्हा अनेकजण उड्या मारु लागतात किंवा कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे अंगविक्षेप करु लागतात. याची दोन मुख्य कारणे आहेत. ती काय हे जाणून घेऊ....
रिद्मिक डिस्प्लेसमेंट बिहेविअर
एखाद्या कामासाठी आपण प्रोत्साहित होतो आणि ते काम करु शकत नसल्याने शरीर रिद्मिक डिस्प्लेसमेंट बिहेविअर करु लागतं. असं वागण्याच्या माध्यमातून आपण एंगजायटी(दबाव) दूर करण्याचा प्रयत्न करीत असतो.
दबाव वाढल्यावर 'डान्स'
जोरात लघवी लागली असताना आणि ही क्रिया करायला मिळत नसल्याने तुम्ही अनेकांना डोकं खाजवणे किंवा नखं खाताना पाहिलं असेल. यालाच रिद्मिक डिस्प्लेसमेंट बिहेविअर असं म्हटलं जातं. लघवी करता येत नसल्याने किंवा तशी संधी मिळत नसल्याने असं होतं आणि आपलं शरीर यातून डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी वेगवेगळ्या हालचाली करु लागतं.
थिअरी ऑफ डिस्ट्रॅक्शन
लघवी लागलेली असताना त्यावरुन आपण मेंदूचं लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न करत असतो. हे वागणं थिअरी ऑफ डिस्ट्रॅक्शनमध्ये येतं. कारण मेंदूचं एखाद्या गोष्टीवरुन लक्ष हटवण्यासाठी आपण दुसरीकडे लक्ष केंद्रीत करु लागतो. यामुळेही आपलं शरीर उड्या मारणं किंवा एका पायात दुसरा पाय अडकवणे या गोष्टी करु लागतं.
या गोष्टीची घ्या काळजी
अशा स्थितीत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे उड्या मारणे किंवा डान्स करण्याच्या स्थितीत तुम्ही तुमच्या ब्लेडरवर दबाव वाढवता. याने लघवीचा प्रवाह सुद्धा वाढतो, ज्यावर तुम्ही कंट्रोल करु शकत नाही.