नखांवर पांढरे डाग का येतात ? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 02:55 PM2022-11-06T14:55:28+5:302022-11-06T14:56:10+5:30
अनेकदा आपल्या नखांवर पांढरे डाग दिसतात. कधीकधी हे डाग आपोआप नाहीसे होतात तर कधीतरी अगदी ठळक दिसतात. याकडे आपण सहसा दुर्लक्षच करतो.
आपल्याला असलेल्या आजारांचा परिणाम अनेकदा शरिराबाहेरील अवयवांमध्ये दिसतो. त्वचा काळवंडणे, चेहऱ्यावरील मुरुम, हातापायावर पुरळ असे काही लक्षणे दिसून येत असतात. तसंच तुम्ही आणखी एक गोष्ट बघितली असेल. अनेकदा आपल्या नखांवर पांढरे डाग दिसतात. कधीकधी हे डाग आपोआप नाहीसे होतात तर कधीतरी अगदी ठळक दिसतात. याकडे आपण सहसा दुर्लक्षच करतो. पण हे असे का होते जाणून घेऊया.
अॅलर्जी
अनेकदा कॉस्मेटिक प्रोडक्ट्स मध्ये वापरलेल्या केमिकल्स मुळे अॅलर्जी होऊ शकते. या अॅलर्जीचा परिणाम नखांवर दिसून येतो. ल्युकोनेशिया या प्रकारात तर पूर्ण नखे पांढरी दिसतात.
कॅल्शियमची कमतरता
शरिरात कॅल्शियमची कमतरता असल्यास नखांवर पांढरे डाग पडायला सुरुवात होते. तसेच रोज पोट साफ होत नसेल तरी हे डाग दिसतात. यासाठी व्यायाम आणि पोषक आहार घेणे गरजेचे आहे.
आनुवंशिक
नखांवरील पांढऱ्या डागांचे कारण अनेकदा आनुवंशिकही असते. आई वडील यांच्यापैकी कोणाला ल्युकोनेशिया असेल तर तुमच्या शरिरातही हा परिणाम दिसतो.
औषधे/उपचार
काही औषधांचाही साईड इफेक्ट अशा प्रकारे दिसून येऊ शकतो ज्यामुळे नखांवर पांढरे डाग दिसतात.तसेच ज्यांना कॅन्सर आहे त्यांनाही किमोथेरपी चा परिणाम म्हणून या प्रकाराला सामोरे जावे लागते.
नखांवर पांढरे डाग येऊ नये म्हणून काय करावे ?
केमिकल्स पासून दूर राहा
केमिकल्स असलेल्या कॉस्मेटिक्स पासून शक्य तितके दूर राहावे. ज्यामुळे आपल्याला अॅलर्जी होऊ शकते असे काही करु किंवा खाऊ नये.
कॅल्शियम व्हिटॅमिन घ्या
कॅल्शियम व्हिटॅमिन योग्य प्रमाणात शरिरात जात असेल तर आजारांपासून तुम्ही दूर राहाल. नियमित पोषक आहेर घेतल्यास कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि प्रोटीन्सची कमतरता जाणवणार नाही. कॅल्शियम व्हिटॅमिनच्या गोळ्याही घेणे सोयीस्कर आहे.