पावसाळ्यातील आजारांपासून बचावासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय व्हिटॅमिन सी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:30 PM2020-08-21T16:30:06+5:302020-08-21T16:34:06+5:30
अनेक आजार या पावसाळ्यात वाढतात. स्कीन इन्फेक्शन, स्कीन अॅलर्जी, पोटाच्या समस्या, सर्दी-खोकला, ताप, केसगळती आणि घशाचं इन्फेक्शन अशा कितीतरी समस्या या पावसाळ्यात होतात.
पावसाळा अनेक चांगल्या गोष्टी सोबत आणतो तसा अनेक वाईट गोष्टीही आणतो. अनेक आजार या पावसाळ्यात वाढतात. स्कीन इन्फेक्शन, स्कीन अॅलर्जी, पोटाच्या समस्या, सर्दी-खोकला, ताप, केसगळती आणि घशाचं इन्फेक्शन अशा कितीतरी समस्या या पावसाळ्यात होतात. कोविड-१९ सोबतच या आजारांसोबतही आपल्याला लढायचं आहे. त्यासाठी आपल्याला आपली इम्यूनिटी सिस्टीम मजबूत ठेवावी लागेल. या सर्व समस्यांचं समाधान बरचसं व्हिटॅमिन सी ने होतं. याबाबत एड्रोइट बायोमेड प्रायव्हेट लिमिटेडचे को-फाउंडर सुशांत रावराणे यांनी सांगितले की, कशाप्रकारे पावसाच्या वातावरणात व्हिटॅमिन सी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं.
आजारांपासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवा
वर सांगितलेल्या समस्या पावसाळ्यात आपल्याला फार जास्त त्रासदायक ठरतात. आणि या समस्यांपासून स्वत:ला दूर ठेवायचं असेल तर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे इम्यूनिटी वाढवण गरजेचं आहे. यासाठी आहारात अशा पदार्थांचा समावेश करा ज्यातून तुम्हाला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळेल.
नुकत्याच बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आले की, व्हिटॅमिन सी मायकोबॅक्टेरिअम स्मॅगमॅटीस नावाच्या एखा नॉन-पॅथोजेनिक बॅक्टेरियाला मारतं. अशात शरीराला व्हिटॅमिन सी सतत मिळत रहावं यासाठी रोज कमीत कमी ५०० मिली ग्रॅम व्हिटॅमिन सी चं सेवन करावं. असं केल्याने केवळ सर्दी-खोकला नाही तर वेगवेगळ्या व्हायरसने होणाऱ्या इन्फेक्शनपासूनही वाचता येतं.
दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो
आपणा सर्वांनाच माहीत आहे की, व्हिटॅमिन सी एक शक्तीशाली अॅंटी-ऑक्सिडेंट आहे. जे आपल्या शरीराच्या नैसर्गिक सुरक्षा प्रणालीला दुरूस्त करतं. अॅंटी-ऑक्सिडेंटने आपली इम्यूनिटी सिस्टीम चांगली राहते. हे असं करतं आपल्या सेल्सना फ्री रॅडिकल्स नावाच्या नुकसानकारक मॉलिक्यूल्सपासून वाचवून. जेव्हा हे फ्री रॅडिकल्स जमा होतात, तेव्हा ते ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस निर्माण करतात. ज्याचा संबंध अनेक क्रॉनिक डिजीज म्हणजे जुन्या आजारांशी असतो. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी चं सेवन केलं तर रक्तात अॅंटी-ऑक्सिडेंटचं प्रमाण साधारण ३० टक्के वाढतं. ज्याने शरीर आजारांससोबत लढण्यासाठी तयार होतं.
व्हिटॅमिन सी ने शरीराची इम्यूनिटी सिस्टीम मजबूत होते
पावसाच्या दिवसात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण यान इम्यूनिटी वाढते. व्हिटॅमिन सी सर्वातआधी व्हाइट ब्लड सेल्सची निर्मिती वाढवतं. याने शरीर इन्फेक्शनसोबत लढण्यास तयार होतं. व्हिटॅमिन सी फ्री रॅडिकल्सने सेल्सचं होणारं नुकसान टाळता येतं. ज्याने व्हाइट ब्लड सेल्स फार प्रभावी होतात. असंही बघायला मिळालं आहे की, नियमित रूपाने व्हिटॅमिन सी चं सेवन केलं तर घाव लवकर भरतात.
त्वचेसाठीही फायदेशीर व्हिटॅमिन सी
त्वचा चांगली ठेवण्यासाठीही व्हिटॅमिन सी फायदेशीर ठरतं. हे त्वचेवर लावल्याने याच्या अॅसिडीक गुणांमुळे कोलेनन आणि इलॅस्टिकचं प्रॉडक्शन वाढतं. ज्यामुळे त्वचेची हीलिंग प्रक्रिया वेगवान होत. यात अनेक प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया मारण्याची क्षमता असते. पावसाळा तर व्हायरस आणि बॅक्टेरिंचा आवडता काळ असतो. अशात जर तुम्ही व्हिटॅमिन सी चं सेवन नियमित केलं तर अनेक फायदे तुम्हाला होतील.
हे पण वाचा :
त्वचेवर सतत येणारी खाज असू शकते लिव्हरच्या 'या' आजाराचं लक्षणं; वेळीच सावध व्हा
निरोगी राहण्यासाठी रोज किती चालायला हवं? जाणून घ्या ५ ते ६० वर्ष वयोगटाचा प्रभावी 'वॉक प्लॅन'
कोरोनाचं ३ तिसरं लक्षणं आहे अंगदुखी आणि मासपेशींतील वेदना; 'या' उपायांनी मिळवा आराम