Diabetes tips: सकाळी रिकाम्यापोटी रक्तातील साखरेची पातळी का वाढते? 'ही' आहेत कारणं, डायबिटीस रुग्णांनी करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 02:51 PM2022-03-04T14:51:10+5:302022-03-04T14:55:01+5:30

रक्तातील साखरेवर (blood sugar) नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयी बदलायला हव्या. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही गोष्टी वर्ज्य करून तुम्ही रक्तातील साखरेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता.

why does sugar level increases in empty stomach know from experts | Diabetes tips: सकाळी रिकाम्यापोटी रक्तातील साखरेची पातळी का वाढते? 'ही' आहेत कारणं, डायबिटीस रुग्णांनी करा 'हे' उपाय

Diabetes tips: सकाळी रिकाम्यापोटी रक्तातील साखरेची पातळी का वाढते? 'ही' आहेत कारणं, डायबिटीस रुग्णांनी करा 'हे' उपाय

googlenewsNext

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळं लोकांना अनेक प्रकारचे आजार जडत आहेत. त्यात मधुमेह (Diabetes) हा देखील एक गंभीर आजार बनला आहे. मधुमेह हा इतर अनेक रोगांचं कारण बनतो. यामध्ये हृदय, मूत्रपिंड, डोळा, मेंदू आणि त्वचेवर खोलवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात (Blood Sugar Level Control) ठेवणं गरजेचं आहे.

रक्तातील साखरेवर (blood sugar) नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयी बदलायला हव्या. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही गोष्टी वर्ज्य करून तुम्ही रक्तातील साखरेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता. परंतु, काही जणांची गोड खाण्याची सवय काही केल्या कमी होत नाही आणि त्यामुळे मग खूप नुकसान होते.

सकाळी रक्तातील साखरेची पातळी का वाढते?
सामान्यतः गोड किंवा आरोग्यास अपायकारक पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढते. परंतु सकाळी रिकाम्या पोटी असूनही रक्तातील साखर वाढते असं अनेक वेळा दिसून आलंय. असं का होतं हे जाणून घेऊ.

1. तज्ज्ञांच्या मते, हार्मोन्समधील बदलामुळं सकाळी रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. रात्री झोपताना हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरात जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार होतं.

2. रात्री उच्च कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेतल्यास सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी औषधं योग्य वेळी घेणं आवश्यक आहे. नाहीतर, दुसऱ्या दिवशी सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढते.

3. झोपण्यापूर्वी इन्सुलिन घेतलं आणि सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढली तर, या स्थितीला रिबाउंड हायपरग्लाइसेमिया (Rebound Hyperglycemia) म्हणतात.

सकाळी रिकाम्या पोटी साखरेची पातळी किती असते?
जर सकाळी रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी 70-100 mg/dl राहिली, तर काळजी करण्यासारखं काही नाही. जर ही पातळी 100-125 mg/dl झाली तर ती सीमारेषा आहे. यापेक्षा जास्त साखर असणं हे मधुमेहाच्या श्रेणीत येतं.

Web Title: why does sugar level increases in empty stomach know from experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.