झोपेत पाहिलेली काही स्वप्ने सकाळी आठवत का नाहीत? जाणून घ्या कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 09:56 AM2019-09-26T09:56:43+5:302019-09-26T10:09:44+5:30
अनेकदा तुम्हाला जाणवलं असेल की, एखादं भारी स्वप्न तुम्ही बघता, पण सकाळी तुम्हाला ते आठवत नाही. याचं कारण काय आहे?
(Image Credit : radioamerica.hn)
तुम्ही अनेकदा या गोष्टीवर लक्ष दिलं असेल की, आपली झोप अचानक उघडते आणि आपल्याला जाणीव होते की, आपण स्वप्नात काहीतरी बघत होतो, त्याबाबत तुम्ही फार एक्सायटेड होता किंवा घाबरलेले असता. याच एक्सायटमेंटमुळे अचानक झोप उघडली जाते. पण झोप उघडल्यावर आपल्याला आठवण राहत नाही की, आपण स्वप्नात काय बघत होतो किंवा पाहिले. तसेच अनेकदा असंही होतं की, सकाळी अलार्मचा आवाज ऐकून आपली झोप उघडते. तेव्हा असं जाणवतं की, तुम्ही झोपलाच नाहीत. तुमचा मेंदू काम करत होता. पण स्वप्नात तुम्ही काय पाहिलं हे आठवण राहतं नाही.
(Image Credit : betterlyf.com)
मानसोपचारतज्ज्ञांनुसार, झोपेत बघितली गेलेली काही स्वप्ने लक्षात राहतात, तर काही स्वप्ने आपण विसरतो. असं स्लीपिंग पॅटर्नमुळे होतं. झोपेत आपला मेंदू झोपेच्या चार टप्प्यांमधून जात असतो. यातील पहिले तीन टप्पे हे नॉन रॅपिड आय मोमेंट असतात, ज्यांना एनआरइएम(NREM) म्हटलं जातं. झोपेचा पहिला टप्पा हा जागे असताना झोपी जाण्याचा असतो. या वेळेत शरीर दिवसाच्या अवस्थेतून स्वत:ला दूर करत रिलॅक्सिंगच्या पोजिशनमध्ये जात असतो.
(Image Credit : bustle.com)
झोपेच्या दुसऱ्या टप्प्यात बघितली गेलेली स्वप्ने आपल्याला जास्त आठवत नाही. याला NREM म्हणतात. झोपेच्या या टप्प्यात मेंदू अॅक्टिव फॉर्गेटिंग स्टेजमध्ये राहतो. एका नव्या रिसर्चमधून समोर आले की, मेंदू असं अनावश्क आठवणी डिलीट करण्यासाठी करतो. तसेच असेही समोर आले आहे की, ही स्वप्ने विसरवण्यात न्यूरॉन्स मदत करतात आणि हेच न्यूरॉन्स आपली भूक कंट्रोल करण्याचं काम करतात. जपानमधील एका युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेला हा रिसर्च जनरल सायन्समध्ये पब्लिश करण्यात आला आहे.