पावसाळ्यात मोड आलेले कडधान्य खाऊन पडू शकता आजारी, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 11:58 AM2024-07-06T11:58:20+5:302024-07-06T12:02:57+5:30

Sprouts In Rainy Season : पावसाळ्यात मोड आलेले कडधान्य खावे की नाही? खासकरून मोड आलेले चणे किंवा मूग पावसाळ्यात खावेत की नाही? तर यावर नाही असं उत्तर एक्सपर्ट देतात.

Why eating sprouts is not good in rainy season? Know the right way to eat | पावसाळ्यात मोड आलेले कडधान्य खाऊन पडू शकता आजारी, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत!

पावसाळ्यात मोड आलेले कडधान्य खाऊन पडू शकता आजारी, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत!

Health Tips: निरोगी राहण्यासाठी बरेच लोक मोड आलेले वेगवेगळे कडधान्य खातात. अनेक लोक आपल्या दिवसाची सुरूवात हे मोड आलेले कच्चे कडधान्य खाऊन करतात. या कडधान्यांचे शरीरात अनेक फायदेही मिळतात. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, पावसाळ्यात मोड आलेले कडधान्य खावे की नाही? खासकरून मोड आलेले चणे किंवा मूग पावसाळ्यात खावेत की नाही? तर यावर नाही असं उत्तर एक्सपर्ट देतात. पण सोबतच तुम्हाला मोड आलेले कडधान्य या दिवसात खायचेच असतील तर कसे खावेत याचाही सल्ला देतात.

पावसाळ्यात वातावरण बदलामुळे, हवेतील ओल्याव्यामुळे, उन्ह कमी पडत असल्याने शरीरावर याचा प्रभाव पडतो. पावसाळ्यात आपली पचनक्रिया खूप कमजोर होते. ज्यामुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या जसे की, अपचन, गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे, डायरिया इत्यादी. त्यामुळे या दिवसात कच्च्या भाज्या खाणं टाळण्याचा सल्ला दिला. हेच मोड आलेल्या कडधान्याबाबत सांगता येईल. न्यूट्रिशनिस्ट व डायटिशिअन गरीमा यांनी त्यांच्या इन्स्टा व्हिडीओत मोड आलेले कडधान्य कसे खावे याबाबत सल्ला दिला आहे.

डायटिशिअन गरीमा यांच्यानुसार, "कडधान्य कधीही कच्चे खाऊ नये. कारण त्यांमध्ये खूप ओलावा असतो. ओलाव्यामुळे त्यात बॅक्टेरिया होतात. कच्चे कडधान्य खाल्ले तर हे बॅक्टेरिया पोटात जातात. ज्यामुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. इम्यूनिटी कमजोर असेल तर चुकूनही कच्चे मोड आलेले कडधान्य खाऊ नये. अशात मोड आलेले कडधान्य कधीही वाफवून किंवा मिठाच्या पाण्यात उकडून खावेत. याने त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतील आणि तुम्हाला समस्या होणार नाहीत". 

पावसाळ्यात मोड आलेले कडधान्य खाऊन काय होतं?

डायरियाचा धोका

पावसाळ्यात मोड आलेले कडधान्य कच्चे का खाऊ नये याचं आणखी एक कारण म्हणजे यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे तुम्हाला जुलाब लागू शकतात. अशात तुमच्या शरीरात पाणी आणि पोषक तत्व कमी होऊ शकतात.

फूड पॉयजनिंगचा धोका

पावसाच्या दिवसात फूड पॉयजनिंग आणि पोट खराब होण्याच्या समस्या जास्त होतात. याचं कारण पाणी आणि इतर गोष्टींमध्ये असलेले बॅक्टेरिया. या बॅक्टेरियामुळे वेगवेगळे इन्फेक्शन होतात, पोट खराब होतं. ज्यामुळे तुम्हाला उलटी, जुलाब लागतात. 

Web Title: Why eating sprouts is not good in rainy season? Know the right way to eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.