Health: व्यायाम केल्याने का येतोय हार्ट अॅटॅक? सायलेंट किलर बनतंय हे कारण, डॉक्टर म्हणतात..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 05:06 PM2022-12-06T17:06:35+5:302022-12-06T17:07:25+5:30
Health News: गेल्या काही दिवसांपासून देशात हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. एकेकाळी हार्ट अॅटॅक हा वृद्धांचा आजार मानला जात होता. मात्र आता तरुणांनाही हृदयविकाराचे झटके येऊ लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून देशात हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. एकेकाळी हार्ट अॅटॅक हा वृद्धांचा आजार मानला जात होता. मात्र आता तरुणांनाही हृदयविकाराचे झटके येऊ लागले आहेत. त्यातही व्यायामशाळेत व्यायाम करताना हार्ट अॅटॅक येण्याची उदाहरणेही समोर येत आहेत.
कमी वयात लोकांमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यांचे प्रमाण वाढल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. तसेच अनेक जणांनी अशा बातम्या वाचल्यापासून जिममध्ये जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे. जिममध्ये जाणाऱ्या लोकांना हार्ट अॅटॅक आणि कार्डियोवेस्कूलर संबंधित आजार का होत आहेत, हे जाणून घेण्यास तसेच या संबंधीचा धोका टाळण्यासाठी काय करता येईल, याबाबत जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितले की, भारतामध्ये हार्ट अॅटॅकच्या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये बहुतांश लोकांचे वय हे ३० ते ४० पेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या साथीनंतर लोकांमध्ये हार्टसंबंधी आजारांचा धोका अधिक वाढला आहे. कारण कोरोना विषाणूमुळे रक्त वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच त्यामुळे हार्टसंबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे.
त्याशिवाय कोरोनानंतरची सुस्त जीवनशैली, चुकीचे खानपान आणि स्ट्रेस लेव्हल वाढल्याने हार्ट अॅटॅकचा धोका वाढला आहे. वाढत्या स्ट्रेसमुळे लोक स्मोकिंग, ड्रिंकिंग करूलागले आहेत, ही बाब हार्ट संबंधीच्या आजारांच्या वाढीसाठी कारणीभूत आहे. तसेच जे कुणी रोज जिममध्ये जातात त्यांनीही आपण पूर्णपणे फिट आहोत, असे समजू नये. कारण त्यांचं शरीर वरून खूप फिट वाटत असलं तरी आतून ते खूप कमकुवत आणि आजारी असते. त्या कमकुवत शरीरावरत गरजेपेक्षा अधिक भार टाकला तर ते योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाही.
शरीरावर गरजेपेक्षा अधिक भार टाकणे, श्वास फुलणे आण हृदयामध्ये ऑक्सिजनच्या पूर्ततेला प्रभावित करते. त्यामुळे हार्ट अॅटॅक किंवा सडन कार्डिएक अरेस्टचा धोका वाढतो. आजकाल तरुण जीममध्ये फिटनेस किंवा अॅब्स बनवण्यासाठी जातात. मात्र सिक्स पॅक अॅब्स बनवल्याने फिटनेस बनत नाही, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
तसेच बॉडी बिल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सप्लिमेंटबाबतही डॉक्टरांनी इशारा दिला आहे. आजकाल तरुण कमी वयात सप्लिमेंटचा अधिक प्रयोग करतात. हे सप्लिमेंट प्रत्येक बॉडीच्या शरीरासाठी योग्य आहेत ही नाही, त्याचा प्रयोग कसा केला पाहिजे, याबाबत माहिती घेतली पाहिजे. सप्लिमेंट नकली असेल, अतिरिक्त सेवन केलं असेल, याबाबत माहिती असूनही कुणी सप्लिमेंटचा वापर करत असेल तर त्यामुळे ब्लड प्रेशर वाढेल आणि हार्ट अॅटॅक येण्याचा धोकाही वाढू शकतो.