हार्ट अटॅकचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त का? कारण आहेत अत्यंत गंभीर अन् धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 09:41 AM2022-07-04T09:41:03+5:302022-07-04T09:41:52+5:30

स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण अधिक असल्याचं (Men Are More Prone To Heart Diseases) संशोधनातून समोर आलं आहे.

why heart attack is most harmful for men than women? know the reasons | हार्ट अटॅकचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त का? कारण आहेत अत्यंत गंभीर अन् धक्कादायक

हार्ट अटॅकचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त का? कारण आहेत अत्यंत गंभीर अन् धक्कादायक

Next

जीवनशैलीमध्ये (Lifestyle) झालेल्या बदलांमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ लागले आहेत. हृदयावरचा ताण (Stress On Heart) प्रचंड वाढला आहे. त्यामुळे हृदयरोगांचं प्रमाण वाढलं आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण अधिक असल्याचं (Men Are More Prone To Heart Diseases) संशोधनातून समोर आलं आहे.

हृदयरोगाचा हा धोका आता तरुणांमध्येही दिसून येऊ लागला आहे. तरुणांमध्येही हार्ट अ‍ॅटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. केवळ पुरुष असणं ही एक गोष्टही हृदयरोगाच्या शक्यतेला पुरेशी असते. पुरुषांना असलेला ताण आणि त्यांचं रागीट व्यक्तिमत्त्व रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरते. पर्यायानं ती हृदयरोगाला (Heart Diseases) आमंत्रित करते. इतकंच नाही, हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणं पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी असतात. पुरुषांमध्ये छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, हात, गळा, पाठीतून मुंग्या येणं अशी लक्षणं दिसतात, तर स्त्रियांना मळमळणं, अस्वस्थ वाटणं, छातीत जळजळ होणं, थकवा, चक्कर येणं अशी लक्षणं जाणवतात.

हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी स्त्रिया व पुरुषांनीही योग्य काळजी घेतली पाहिजे. पुरुषांना हृदयरोगाचा धोका जास्त असल्यानं पुरुषांनी काय काळजी घेतली, तर हृदयरोगाचा धोका कमी करता येईल, हे जाणून घेऊ या.

व्यायाम
चालण्याचा (Walking) साधा-सोपा व्यायामही हृदयरोगाच्या शक्यतेला दूर करतो. त्यासोबत धावणं, चालणं, सायकलिंग, पळणं हे नेहमीचे व्यायामप्रकार पुरुषांनी करावेत, असा सल्ला डॉक्टर देतात. रूटीनमध्ये व्यायामाचा समावेश केल्यानं बरेचसे आजार दूर ठेवण्यास मदत होते.

आहार
व्यायामासोबतच आहारही (Diet) उत्तम असला पाहिजे. आहारात भाज्या, फळं आणि डाळींचा समावेश ठेवावा. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर्स असतातच. शिवाय त्यात कॅलरीजही कमी असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

मर्यादित सॅच्युरेटेड फॅट्स
शरीराला फॅट्सची आवश्यकता असते; मात्र ते फॅट्स कोणते व किती प्रमाणात असावेत, याचे काही नियम आहेत. हृदयावर परिणाम करणारे सॅच्युरेटेड फॅट्स आहारात कमीत कमी घ्यावेत. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होईल. रेड मीट आणि बटर अशा पदार्थांमध्ये हे सॅच्युरेटेड फॅट्स असतात.

ताण व्यवस्थापन
शरीराप्रमाणेच मनावर ताण आला, तर आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होतात. विशेषतः हृदयाला यामुळे धोका निर्माण होतो. ताण हलका (Stress Management) करण्यासाठी पुरेशी झोप घेणं, मेडिटेशन, मनाची अस्वस्थता दूर करणाऱ्या अ‍ॅक्टिव्हिटीज, व्यायाम या गोष्टी गरजेच्या असतात.

वाईट सवयी सोडा
धूम्रपान (Smoking) हृदयासाठी हानिकारक असतं. हृदयाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर धूम्रपान परिणाम करतं. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. अतिरेकी मद्यपान (Drinking Alcohol) केल्यामुळेही हृदय बंद पडणं, रक्तदाब वाढणं, स्ट्रोक येणं अशा गोष्टी घडू शकतात.दैनंदिन आयुष्यात काही चांगले आणि सोपे बदल करून हृदयरोगाचा धोका कमी करता येऊ शकतो. शरीरासोबतच मनालाही निरोगी आणि आनंदी ठेवलं, तर हृदयाचं आयुष्य वाढेल.

Web Title: why heart attack is most harmful for men than women? know the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.